शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्यात कोरोना सप्टेंबरमध्ये शिखरावर; तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 04:27 IST

डॉ. मूर्ती । ही अवस्था प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या काळात

हैदराबाद : देशात एकाच वेळी कोरोनाची साथ शिखराला पोहोचणे अशक्य आहे. ही अवस्था प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या दिवशी गाठली जाईल. दिल्लीमध्ये ती या महिन्यात किंवा ऑगस्टच्या प्रारंभी तर महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये ही वेळ सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे असे हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेचे संचालक प्रा. जी. व्ही. एस. मूर्ती यांनी सांगितले.

प्रा. मूर्ती हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील (एम्स) कम्युनिटी ऑप्थॅल्मॉलॉजी विभागाचे संस्थापक आहेत. ते या विभागाचे २०१० सालापर्यंत प्रमुख होते. ते म्हणाले, स्थलांतरित मजूर परत आल्यानंतर झारखंड राज्यामध्ये कोरोना साथीचा फैलाव सुरू झाला होता. तेथे कोरोना साथीला शिखर गाठण्यास अजून काही काळ लागेल. प्रत्येक राज्यात किती लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यावर साथीचा सर्वोच्च फैलाव अवलंबून आहे. त्यामुळे देशात एकाच वेळी कोरोनाची साथ कळसाला पोहोचणे शक्य नाही. मुंबई, दिल्लीहून स्थलांतरित मजूर परत आल्यानंतर बिहारमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढली. या साथीसंदर्भात प्रत्येक राज्याची स्थिती निरनिराळी आहे.

प्रा. मूर्ती यांनी सांगितले, कोरोनाची साथ नियंत्रणात राखण्यासाठी सरकारने योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. तसेच लोकांनीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, थोड्या थोड्या वेळाने हात धुणे या गोष्टी केल्या पाहिजेत. झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग यासारख्या ठिकाणी कोरोनाची साथ सप्टेंबर किंवा आॅक्टोबरमध्ये शिखर गाठण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्र, हरयाणा, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये ही वेळ सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत येऊ शकते.फैलावाबाबत बेसावध न राहण्याचे आवाहनआयआयपीएच या संस्थेचे संचालक प्रा. मूर्ती यांनी सांगितले की, काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर या साथीवर आपण काही प्रमाणात नियंत्रण मिळविले असे तेथील सरकारला वाटले होते. केरळसारख्या राज्यात कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे असे वाटत असतानाच तिथे दहा दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. या फैलावाबाबत कोणीही बेसावध राहू नये.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस