शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

‘कोरोना’मुळे ‘मेड इन चायना’ला फटका; भारताला फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 11:40 IST

तीन महिन्यांपासून चीनमधून आयात बंद

ठळक मुद्देहोळीची बाजारपेठ स्थानिक विक्रेत्यांना लाभ  दरवर्षी चीनमधून पिचकारी, ढोल, रंग, टोपी, पुंगी आदी साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत होळीच्या बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढली मिरज, कोल्हापूर, मुंबई, दिल्ली, सुरत, उल्हासनगर या ठिकाणांहून उत्पादने विक्रीसाठी

पुणे : कोरोना विषाणू जगासाठी चिंतेचाच विषय झाला आहे; मात्र होळीचे साहित्य विकणाऱ्या भारतीय विक्रेत्यांसाठी कोरोना विषाणू लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे चीनमधून भारतीय बाजारपेठेत येणारी उत्पादने मागील तीन महिन्यांपासून येणे बंद झाली आहेत. त्यामुळे होळीच्या बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढली आहे, अशी माहिती शहरातील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली.    दर वर्षी चीनमधून पिचकारी, ढोल, रंग, टोपी, पुंगी आदी साहित्य मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेत येत असते; परंतु या वेळी कोरोनामुळे ती आली नाहीत. शहरातील विक्रेत्यांनी मिरज, कोल्हापूर, मुंबई, दिल्ली, सुरत, उल्हासनगर या ठिकाणांहून उत्पादने विक्रीसाठी मागवली आहेत.     भारतातील बहुतांश सणांमध्ये चीनहून येणाºया उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. कोरोनाबरोबरच, केंद्र सरकारने मेक इन इंडिया, चीनमधून येणाºया उत्पादनांवर लावलेला कर यामुळे सुद्धा चिनी उत्पादने भारतीय बाजारपेठेत कमी झाली आहेत असे विक्रेत्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचा परिणाम हा येणाºया सणांवर देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. अनेक वर्षांपासून सणासुदीला चिनी उत्पादनांची मागणी अधिक असल्यामुळे विक्रेते भारतीय उत्पादने कमी प्रमाणात विक्रीसाठी ठेवत असत. परंतु आता स्थितीत बदल झाला असून भारतातील उत्पादने थोडी-फार महाग असली, तरी ती खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याने आगामी काळात भारतीय उत्पादनांना चांगले दिवस येतील, असे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले. ...............................................................................................यंदाची होळी ही भारतीय उत्पादन विक्रेत्यांसाठी लाभदायी ठरत आहे. यंदा भारतीय बनावटीच्या उत्पादनाला मागणी दिसून येत आहे. येणाºया सणांमध्ये सुद्धा भारतीय उत्पादनांची मागणी वाढेल, असे दिसून येत आहे. कोरोनामुळे का होईना यंदा विक्रेत्यांसाठी होळी लाभदायी ठरणार आहे.                                     सुरेश जैन, अध्यक्ष, शहर व्यापारी असोसिएशन दर वर्षी होळीला ज्याप्रमाणात चिनी उत्पादन भारतीय बाजारपेठेत येते, त्या तुलनेत यंदा ते कमी प्रमाणात आल्यामुळे भारतीय उत्पादनांना मागणी वाढली आहे. ग्राहकांमध्ये भारतीय उत्पादने खरेदी करण्याबाबत जागृतता दिसून येत आहे.                                                                मदन शेंडे, ठोक विक्रेते ...........................................कोरोनामुळे ग्राहक चिनी उत्पादनांची मागणी करत नाही आहे, असे सध्या दिसून येत आहे. भारतीय उत्पादन करणाºया कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे चिनी उत्पादनांवर परिणाम झाला आहे. विशाल मळकेकर, विक्रेते ........................................समाज माध्यमांमुळे देखील परिणाम समाज माध्यमांवर भारतीय उत्पादने खरेदी करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर मेसेज फिरत आहे. चिनी रंगांमुळे होणारे परिणाम, चीन-भारत संबंध यांमुळे देखील चिनी उत्पादने कमी प्रमाणात विकली जात आहे.-----------------चायना वस्तूंपासून दूर राहा : पालक सध्या सोशल मीडियावर देखील चीनी वस्तू न वापरता होळी साजरी करा, असा संदेश फिरत आहे. त्यामुळे आई-वडिल आपल्या पाल्यांना चायना वस्तूंपासून दूर ठेवत आहेत. चायना वस्तूंपासून ‘कोरोना’ विषाणू कसा आणि कुठून आपल्याला बाधीत करेल, हे सांगता येत नाही, म्हणून चायना माल दूरच ठेवण्याचा प्रयत्न भारतीय पालक करीत आहेत. ............................................................................................ 

टॅग्स :PuneपुणेHoliहोळीchinaचीनcorona virusकोरोनाMarketबाजार