ज्योतिष शिक्षणात सुसूत्रीकरण यावे
By Admin | Updated: August 22, 2014 00:11 IST2014-08-22T00:11:15+5:302014-08-22T00:11:15+5:30
‘‘कोणीही उठतं आणि वर्षभर थोडसं ज्योतिषशास्त्र शिकतो व ज्योतिषी म्हणून पाटी लावतो. यामुळे ज्योतिषशास्त्रचीच प्रतिमा खराब होते. त्यासाठी ज्योतिष शिक्षणाचे सुसूत्रीकरण व्हायला हवे.

ज्योतिष शिक्षणात सुसूत्रीकरण यावे
पुणो : ‘‘कोणीही उठतं आणि वर्षभर थोडसं ज्योतिषशास्त्र शिकतो व ज्योतिषी म्हणून पाटी लावतो. यामुळे ज्योतिषशास्त्रचीच प्रतिमा खराब होते. त्यासाठी ज्योतिष शिक्षणाचे सुसूत्रीकरण व्हायला हवे. शिक्षणाचा कालखंड, पदवी, अभ्यासक्रम, पाठय़पुस्तक, टक्केवारी हे निश्चित करणो गरजेचे आहे,’’ असे मत ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. वासुदेव जोशी यांनी व्यक्त केले.
भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते झाले. या वेळी जोशी अध्यक्षस्थानी होते. फ्युचर पाईंट दिल्लीच्या आभा बन्सल, स्वागताध्यक्ष सुनंदा राठी, ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे, पुष्पलता शेवाळे, कार्याध्यक्ष नवीनकुमार शहा उपस्थित होते. चंद्रपूरचे ज्योतिर्विद गो. बा. राजकोंडावर यांना ग्रहांकित जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
रघुवीर खटावकर लिखित किमयागार राहू, आनंददायी शुक्र, सत्ताधीश शनी, देवांचे गुरू ब्रहस्पती, प्र. सु. आंबेकर लिखित नक्षत्रज्योती, गृह ज्योतिष, राशी ज्योतिष, निवडक ग्रहांकित, मेष ते मीन लगA, मोहन फडके लिखित मंत्रशास्त्रद्वारे रोगमुक्ती, वि. ह. कुलकर्णी लिखित तान्हुल्यांचे शिल्पकार, रा. रा. कुलकर्णी लिखित अंक ज्योतिष, भाऊसाहेब चाकूरकर लिखित नाडी ज्योतिष, उदयराज सहानी लिखित कुंडली रहस्य दर्शन, सुहास डोंगरे लिखित शनी रवीचा चक्रव्यूह, सुमती सावंत लिखित कृष्णमूर्ती पद्धती एक मॅजिक, कराड वैभव यांचा विशेषांकांचे प्रकाशन झाले. (प्रतिनिधी)
4जोशी म्हणाले, ‘‘ज्योतिषशास्त्रचा प्रचार फार झाला आहे. मात्र, आता त्याची प्रतिमा प्रतिष्ठेची करण्यासाठी प्रय} करायला हवा. ज्योतिष हे केवळ शास्त्र नसून विद्या आहे. त्याला अध्यात्माची जोड मिळाली, की त्याची विद्या होते. पूर्वीचे लोक जे बोलत ते खरे व्हायचे. कारण त्यांच्या भविष्याला अध्यात्माची जोड होती. त्यामुळे ज्योतिर्विद्येच्या अभ्यासक्रमात अध्यात्म, वेद, उपनिषद तसेच मानसशास्त्र या विषयांचाही समावेश असणो आवश्यक आहे.’’ त्याचप्रमाणो ज्योतिषशास्त्रत संशोधनाची आवश्यकता असून भालचंद्र विद्यापीठ हे त्याचे केंद्रस्थान बनावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्योतिषशास्त्रच्या सार्थकतेने विचार करताना काही कमतरता जाणवतात. सध्याचा काळ आणि जुना काळ यात फार फरक आहे. त्यामुळे काळाप्रमाणो बदल करणो आवश्यकच आहे. जुनेच मापदंड अद्यापही लागू होतील असे नाही. यासाठी अधिक संशोधन होणो आवश्यक आहे. तसेच जे शोध लावले आहेत ते मोकळेपणाने स्वीकारणो अत्यंत महत्त्वाचे आहे.
- आभा बन्सल, फ्युचर पाईंट दिल्ली
ज्योतिष ही समाजाला उपयुक्त अशी विद्या असल्याने महाराष्ट्रात अनेक संस्था ज्योतिष शिकविण्याचे कार्य करीत आहेत. हा उपक्रम चांगला असून, सर्व संस्थांमध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम सारखाच असेल, तर या शास्त्रची उपयुक्तता वाढेल.
- डॉ. शिवाजीराव कदम,
कुलगुरू, भारती विद्यापीठ