शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीमध्ये समन्वय समिती, प्रसाद लाड समन्वयक; प्रत्येकी चार नेत्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 07:43 IST

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दोन पक्षांचे काही मंत्री महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी दोनवेळा एकत्र बसले होते; पण त्याला समितीचे स्वरूप नव्हते

मुंबई : सत्तारुढ भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात समन्वयासाठी अखेर एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी चार नेते या समितीत असतील. भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड हे समितीचे समन्वयक असतील. तीन पक्षांमधील विसंवाद दूर करण्याचे काम ही समिती करेल. वादाचे विषय माध्यमांसमोर नेण्याऐवजी आधी या समितीत त्यांची चर्चा केली जाईल व नंतर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना त्याबाबतची माहिती दिली जाईल. 

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दोन पक्षांचे काही मंत्री महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी दोनवेळा एकत्र बसले होते; पण त्याला समितीचे स्वरूप नव्हते. मध्यंतरी एका जाहिरातीवरून भाजप-शिवसेनेत काहीसा तणाव निर्माण झाल्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्याचे ठरले होते. शंभूराज देसाई यांनी तशी माहितीही माध्यमांना दिली होती. आता युतीमध्ये राष्ट्रवादी हा आणखी एक पक्ष सहभागी झाल्यानंतर तीन पक्षांची मिळून समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. 

समितीत यांचा समावेश समितीमध्ये भाजपतर्फे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे आणि खा. राहुल शेवाळे तर राष्ट्रवादीतर्फे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ,  दिलीप वळसे-पाटील व धनंजय मुंडे यांचा समावेश आहे.

समन्वय समितीच्या माध्यमातून राज्याच्या विकासकामांचा लेखाजोखा घेतला जाणार असून, तीनही पक्षांमध्ये निधी वाटपापासून ते महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात समन्वय समितीच्या माध्यमातून योग्य समन्वय साधला जाणार आहे. - आ. प्रसाद लाड, समितीचे समन्वयक 

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPrasad Ladप्रसाद लाड