शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुका, सहकारी निवडणूक प्राधिकरणाची तयारी

By दीपक भातुसे | Updated: December 31, 2024 08:34 IST

सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नसल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सहकार विभागाने निवडणूक प्राधिकरणाला सूचनाही दिल्या आहेत...

दीपक भातुसे

मुंबई : आधी लोकसभा निवडणूक, नंतर पावसाळा आणि नंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वर्षभर रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल नववर्षाच्या सुरुवातीला वाजणार आहे. राज्य सरकारने राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत  स्थगिती दिली होती. त्याची मुदत संपत असल्याने नव वर्षात बुधवार १ जानेवारी २०२५ पासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण प्रक्रिया सुरू करणार आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नसल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सहकार विभागाने निवडणूक प्राधिकरणाला सूचनाही दिल्या आहेत. निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, प्रशासक, प्रशासक मंडळ नियुक्त केलेल्या सहकारी संस्था, हंगामी समितीचा कालावधी संपुष्टात आलेल्या सहकारी संस्था यांच्या निवडणूक प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. यात गृहनिर्माण संस्थांसह दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक व पतसंस्थांचा समावेश असेल. न्यायालयाने प्रतिबंध केला आहे, त्या सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र घेण्यात येणार नाहीत.

२९,४२९ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित- २०२४-२५ या वर्षात राज्यातील २९,४२९ सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यापैकी ७,१०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आली होती.-  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक पूर्वतयारीसाठी तसेच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची सेवा अधिग्रहित करू शकतात.- त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यात अडचणी येऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन सहकार विभागाने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. 

वर्षात तीनदा स्थगिती- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्च रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ३१ मे पर्यंत स्थगिती- राज्यातील पावसाची परिस्थिती विचारात घेऊन २० जून रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबर रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024