कुरकुंभ मोरीला सहकार्य करू : देवेंद्र फडणवीस

By Admin | Updated: June 29, 2016 01:14 IST2016-06-29T01:14:19+5:302016-06-29T01:14:19+5:30

दौंड येथील रेल्वे कुरकुंभ मोरीच्या कामासाठी सहकार्य करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिष्टमंडळाला दिले

Cooperate with Kurakumbh Mori: Devendra Fadnavis | कुरकुंभ मोरीला सहकार्य करू : देवेंद्र फडणवीस

कुरकुंभ मोरीला सहकार्य करू : देवेंद्र फडणवीस


दौंड : दौंड येथील रेल्वे कुरकुंभ मोरीच्या कामासाठी सहकार्य करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग यांनी संयुक्तरित्या दिली.
दरम्यान शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
रेल्वे कुरकुंभ मोरीचा प्रश्न रेंगाळलेला आहे. यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तर या मोरीसाठी खासदार सुप्रिया सुळे तत्कालीन आमदार रमेश थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या मोरीच्या कामाला मंजुरी मिळाली मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या मोरीचे काम रेंगाळलेले आहे.
परिणामी याचा उपद्रव दौंड तालुक्यातील जनतेला होत असल्याची वस्तुस्थिती आहे. तेव्हा राज्य शासनाने या मोरीच्या कामासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
या शिष्ट मंडळात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा उषा दराडे, अप्पासाहेब पवार,
गुरुमुख नारंग, हरेश रांभिया सहभागी झाले होते.
(वार्ताहर)

Web Title: Cooperate with Kurakumbh Mori: Devendra Fadnavis