ऊर्जा बचत उपक्र माला सहकार्य करा
By Admin | Updated: July 15, 2014 01:13 IST2014-07-15T01:13:30+5:302014-07-15T01:13:30+5:30
वीज टंचाई विचारात घेता महापालिकेतर्फे दर पौर्णिमेला एक तास ऊर्जा बचत करण्याचा उपक्र म राबविला जातो. या उपक्र माला सहकार्य करा असे आवाहन महापौर अनिल सोले यांनी केले. गुरुपौर्णिमेच्या

ऊर्जा बचत उपक्र माला सहकार्य करा
महापालिका : महापौरांचे नागरिकांना आवाहन
नागपूर : वीज टंचाई विचारात घेता महापालिकेतर्फे दर पौर्णिमेला एक तास ऊर्जा बचत करण्याचा उपक्र म राबविला जातो. या उपक्र माला सहकार्य करा असे आवाहन महापौर अनिल सोले यांनी केले. गुरुपौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीनगर चौकात आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते.
पौर्णिमेला लक्ष्मीनगर चौकाकडून आठरस्ता चौक, माटे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद ठेवण्यात आले. लक्ष्मीनगर चौकात मनपा अधिकारी व ग्रीन व्हिजन फाऊंडेशनचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून ऊर्जा बचतीचे आवाहन केले. पौर्णिमेला ऊर्जा बचत करतो. सोबतच दैनंदिन वापरातही वीज बचत करा. प्रतिष्ठान, कार्यालयात वीज उपकरणांचा अनावश्यक वापर टाळा, असे आवाहन सोले यांनी केले.
एक युनिट वीज निर्मितीसाठी ५०० ग्रॅम कोळसा व ७.५ लिटर पाणी लागते. सोबतच १००० ग्रॅम कार्बनडाय आॅक्साईड वायुचे उत्सर्जन होते. त्यामुळे वीज वाचवा, पृथ्वी वाचवा व पौर्णिमा दिवस साजरा करा, असे आवाहन सोले यांनी नागरिकांना केले. गुरुपौर्णिमेला रात्री एक तास शहरातील पथदिवे बंद ठेवून १५५ युनिट वीज बचत करण्यात आली.
यावेळी कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उपअभियंता अरुण मानकर, ग्रीन व्हिजन फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, दक्षता बोरकर, सुरभी जैस्वाल, हेमंत अमेसार, राहुल राठोड यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)