पाककला स्पर्धेने वाढणार श्रावणाची गोडी!

By Admin | Updated: August 3, 2016 02:19 IST2016-08-03T02:19:06+5:302016-08-03T02:19:06+5:30

सणवारांना आणखी खास बनविण्यासाठी मिती क्रिएशन्सतर्फे श्रावण महोत्सव २०१६चे आयोजन करण्यात येत आहे.

Cooking competition will increase with Shravan! | पाककला स्पर्धेने वाढणार श्रावणाची गोडी!

पाककला स्पर्धेने वाढणार श्रावणाची गोडी!


मुंबई : श्रावण म्हटला की, सणवार आलेच. या सणवारांना आणखी खास बनविण्यासाठी मिती क्रिएशन्सतर्फे श्रावण महोत्सव २०१६चे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत पहिल्यांदाच आंतर महिला मंडळ पाककला स्पर्धा पार पडणार आहे. या पाककला स्पर्धेमुळे व्रतवैकल्याच्या श्रावण महिन्याची गोडी आणखीनच वाढेल यात शंका नाही. या श्रावणमहोत्सव २०१६ ला ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहेत, तर असोसिएट पार्टनर ‘वंडरशेफ’ आहेत.
मुंबई मधील १३ महिला मंडळांचा या स्पर्धेत समावेश असेल. प्रत्येक महिला मंडळांमध्ये प्राथमिक फेरी घेतली जाईल आणि प्रत्येक महिला मंडळातून पाच जणींची निवड करुन त्यांचा समूह बनविला जाईल. हा समूह अंतिम फेरीमध्ये त्यांच्या मंडळाचे प्रतिनिधित्तव करेल. अंतिम फेरीचे मुख्य परीक्षक विठ्ठल कामत असतील.
या पाककला स्पर्धेची संकल्पना व संयोजन उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्सतर्फे केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रोजेक्ट असोसिएट्स म्हणून मिती ग्रुपचे निलय वैद्य काम पाहत आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एक श्रावणातील पारंपरिक पदार्थ आणि बटाट्याशिवाय अन्य सारण घालून वडा करणे. तर अंतिम फेरीत इंडियन राईस रेसिपी (भारतीय भाताचा कुठलाही एक प्रकार) आणि मधाचा वापर करुन तयार केलेला गोड पदार्थ अथवा पेय करण्याचे आव्हान स्पर्धकांना असेल. एकूणच पदार्थांच्या चवीवर आणि सादरीकरणावर स्पर्धेचा निर्णय अवलंबून असेल.
अंतिम फेरीत तीन महिला मंडळांची प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानासाठी निवड केली जाईल. पाच महिलांचा मिळून एक समूह म्हणजेच १५ महिलांची विजेत्या म्हणून निवड केली जाणार आहे. त्या सर्व महिलांना एस्सेल वर्ल्डतर्फे प्रत्येकी ४ मोफत पासेस आणि ‘आॅर्किड’ हॉटेलच्या स्पेशल ब्रेकफास्टची मेजवानी विठ्ठल कामत यांच्या सोबत मिळणार आहे. तसेच बक्षिस म्हणून वंडरशेफ, पितांबरी, तन्वी हर्बल्स, फोंडाघाट फार्मसी यांची गिफ्ट हँम्पर्स असतील. त्याचप्रमाणे सहभागी झालेल्या प्रत्येक महिला मंडळाला एस्सेल वर्ल्डची सहल ५० टक्के सवलतीत करता येईल. (प्रतिनिधी)
>उद्या सायन भगिनी समाजात प्राथमिक फेरीचा शुभारंभ
सायन भगिनी समाज या मंडळांपासून प्राथमिक फेरीचा आरंभ होणार आहे. सायन येथे ४ आॅगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता प्लॉट नं, 6-ए, गुरुकृपा हॉटेल समोर, सायन (पश्चिम) येथे ही प्राथमिक फेरी रंगणार आहे.

Web Title: Cooking competition will increase with Shravan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.