अघोरी शक्तीसाठी रूपेशचा नरबळी

By Admin | Updated: November 16, 2014 00:49 IST2014-11-16T00:49:28+5:302014-11-16T00:49:28+5:30

सात दिवसांपासून विदर्भात गाजत असलेल्या रूपेश मुळे मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. अघोरी शक्ती वाढविण्यासाठी रूपेशचा नरबळी दिल्याची धक्कादायक बाब

Convertile power for the power of the aghori | अघोरी शक्तीसाठी रूपेशचा नरबळी

अघोरी शक्तीसाठी रूपेशचा नरबळी

तपासात निष्पन्न : गुप्तधन शोधणाऱ्यांसाठी आरोपी होता ‘कारागीर’
वर्धा : सात दिवसांपासून विदर्भात गाजत असलेल्या रूपेश मुळे मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. अघोरी शक्ती वाढविण्यासाठी रूपेशचा नरबळी दिल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात आसिफ शहा वल्द अजीम शहा ऊर्फ मुन्ना पठाण (४०) रा. कारला सावजीनगर, वर्धा (मूळचा रा. सावध ता. बाभुळगाव जि.यवतमाळ) हा एकमेव आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
सुुमारे १२ वर्षांपूर्वी आसिफ पश्चिम बंगाल येथून काळी विद्या शिकला. तेथून यवतमाळातील स्वगावी आल्यानंतर त्याची गुप्तधनाची लालसा वाढली. काही मांत्रिकांकडून याबाबतची माहितीही त्याने जाणून घेतली. यानंतर त्याने ही विद्याही आत्मसात केली. तेव्हापासून तो गुप्त धनाच्या शोधात होता. मात्र त्याला प्रत्येकवेळी अपयशच आले. यामुळे तो खचून गेला होता. दीड वर्षांपूर्वी तो वर्धेत वास्तव्याला आला. येथे तो आॅटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता. अशातच त्याने देवळी तालुक्यात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केला असता तिथेही त्याला अपयश आले. आपली विद्या कमी पडत आहे. ती वाढविण्यासाठी नरबळी देण्याचा अघोरी विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागला. तेव्हापासून तो एका कोवळ्या मुलाच्या शोधात होता.
अखेर ८ नोव्हेंबरला त्याने नरबळी देऊन हनुमानजीची महापूजा करण्याचा बेत आखला. तो नेहमी आर्वी नाका चौक परिसरातून आॅटोचा व्यवसाय करायचा. त्यामुळे त्याची लागूनच असलेल्या झोपडपट्टीतील लोकांशी ओळख झाली होती. रूपेशसह त्याच्या वडिलांच्याही तो संपर्कात होता. मात्र तो असे अघोरी कृत्य करेल, अशी कुणालाही कल्पना नव्हती.
८ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता रुपेश आपल्या घराच्या परिसरात मित्रासोबत खेळत असताना फिरायला जाऊ, असे सांगून तो त्याला आॅटोमध्ये बसवून घेऊन गेला. े रूपेशला घेऊन तो
असा लागला छडा
रूपेशची हत्या वा नरबळी याबाबत पोलीस साशंक होते. मात्र आरोपीपर्यंत पोहोचणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. अशातच पोलिसांनी परिसरातील काही नागरिकांचे बयाण नोंदविले असता रूपेश त्यादिवशी आसिफच्या आॅटोमध्ये बसल्याची माहिती मिळाली. या आधारे पोलिसांनी संशयित म्हणून आसिफला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता रक्ताने माखलेली चादर सापडली. यावरुन पोलिसांचा संशय पक्का झाला.
‘लोकमत’ने सर्वप्रथम वर्तविला होता नरबळीचा संशय
रूपेशच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वप्रथम ‘लोकमत’ने नरबळीचा संशय वर्तविला होता. इतकेच नव्हे, तर आरोपीला अटक होईपर्यंत आणि प्रकरणाचा छडा लागेपर्यंत हे प्रकरण उचलून धरले होते. यामुळे या घटनेने संतप्त वर्धेकर रस्त्यावर उतरले होते. विविध संघटनाही रूपेशला न्याय देण्याच्या मागणीला घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने हाताळल्याने विदारक सत्य पुढे आले.

Web Title: Convertile power for the power of the aghori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.