शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाची तारीख ७ की ११ डिसेंबर? समितीच्या बैठकीत आज अंतिम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 11:01 IST

Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार की ११ डिसेंबरपासून याबाबतचा गोंधळ कायम आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय होईल. 

मुंबई - राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार की ११ डिसेंबरपासून याबाबतचा गोंधळ कायम आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय होईल.

विधिमंडळाच्या मुंबईत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूरचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र,  गेल्या आठवड्यात अशी चर्चा सुरू झाली, की अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होईल. ११ पासून अधिवेशन घेतले तर पहिला दिवस शोकप्रस्तावात जाईल. दुसऱ्या दिवशी आरक्षण आदी विषयांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल ते १३ डिसेंबरपासून. २० डिसेंबरला अधिवेशन संपविले तर केवळ आठ दिवसांचे अधिवेशन होईल. विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असेल, अशी टीका आता सुरू झाली आहे. 

आरक्षणावर चर्चा होणार : नीलम गोऱ्हे नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. मात्र, ती कोणत्या दिवशी होईल, हे निश्चत झाले नाही. त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. या चर्चेत सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. विधानभवनातील सभागृहात मंगळवारी बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कामकाजाला कात्री?उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विदर्भाचे असताना नागपूर अधिवेशनाला कात्री लावली जाते का, याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन