शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीशांच्या शपथविधीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवरुन वाद? उज्ज्वल निकम म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:08 IST

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टिका केली होती.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी औरंगाबाद दौऱ्यातील सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह ठाकरे गटातील शिवसेना नेत्यांवरही त्यांनी तोफ डागली. मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. प्रामुख्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. जयंत पाटील यांनाही, कसं काय पाटील बरं हाय का... असे म्हणत टोमणा मारला. तसेच, सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला गेल्यावरुन केलेल्या टिकेला प्रत्युत्तरही दिलं. आता, या वादावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपल मत नोंदवलं आहे. 

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टिका केली होती. दिल्लीत सरन्यायाधीशांच्या शपथविधी  सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. तसेच, सध्या शिवसेना आणि शिंदे सरकार यांच्याशी संबंधित खटले सर्वोच्च न्यायालयात सुरु आहेत. यासंदर्भात स्वतंत्र खंडपीठही नेमण्यात आलं असून ते सरन्यायाधीश लळित यांच्या मार्गदर्शनात नेमण्यात आलं आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री शिंदेंनी या सोहळ्याला जाणे उचित नसल्याची टिका विरोधकांनी केली होती. विरोधकांच्या टिकेला मुख्यमंत्री शिंदेंनी औरंगाबादेतून प्रत्युत्तर दिलंय. त्यानंतर, आता उज्ज्वल निकम यांनीही आपलं मत व्यक्त केलं. 

“एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आले होते. आत्तापर्यंतचा प्रघात आहे की भारतातील सर्व न्यायाधीशांचा ज्यावेळी सत्कार होत असतो त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नेते उपस्थित राहतात. उगाच त्यामधून अर्थ आणि गैरअर्थ काढणं योग्य नाही,” असं निकम यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात टीव्ही ९ वेबसाईटने वृत्त प्रकाशित केलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे

एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होत आहे, त्यांचं अभिनंदन करायला आम्ही गेलो होते. विशेष म्हणजे या सोहळ्याचं आम्हाला आमंत्रणही होते. विरोधी पक्षनेत्यांनाही आमंत्रण होतं, असेही शिंदे यांनी म्हटले. त्यानंतर, पाटील यांच्यावर टीकाही केली.  

 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमEknath Shindeएकनाथ शिंदेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस