शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीराजेंवर केलेल्या 'त्या' विधानावरून वाद; जितेंद्र आव्हाडांच्या कारवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:39 IST

विशालगडावर झालेल्या आंदोलनावर टीका करताना जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली होती. 

मुंबई - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारवर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेचे हे कार्यकर्ते असल्याचं बोललं जातं. संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणण्याचा अधिकार नाही असं विधान आव्हाडांनी केले होते. त्यामुळे स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आज हा हल्ला झालेला आहे.

मुंबईत आज जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषद होती. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर आव्हाड त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी निघाले होते. त्यावेळी वाटेत वाहतूक कोंडीत आव्हाडांची कार अडकली असता त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची कार वेगाने पुढे नेण्यात आली. या हल्ल्याची जबाबादारी स्वराज्य संघटनेने घेतली आहे. 

संभाजीराजे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केली. तू मर्द असता तर पळाला नसता, तू पळपुटा आहेस हे महाराष्ट्राला कळालं आहे असं विधान स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांचं वाहन जितेंद्र आव्हाडांच्या कारमागे होते. त्यावेळी शेजारून आलेल्या वाहनातून हे कार्यकर्ते उतरले आणि त्यांनी हातातील बांबूच्या सहाय्याने आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत घोषणा दिल्या. विशालगडावर संभाजीराजे यांनी जे आंदोलन केले होते त्यावर जितेंद्र आव्हाडांनी नापसंती व्यक्त केली होती. 

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

संभाजीराजेंनी आता छत्रपती म्हणणं सोडून द्यावं. त्यांना जो अधिकार होता, शाहू महाराजांची जी वंश परंपरा होती, त्या वंशाचं रक्त संभाजीराजे पुढे घेऊन जात होते. त्यांच्या रक्तात काय होते आणि संभाजीराजेंच्या रक्तात काय हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातील वारस असलेला व्यक्ती असं विधान करतो, ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारस होऊच शकत नाही असं विधान जितेंद्र आव्हाडांनी विशालगडावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले होते.  राज्यात कायद्याचा प्रश्न, राजीनामा द्यावा - काँग्रेस   

महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही इतका कायदा सुव्यवस्था बिघडला नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाही हे सगळं होतंय. राज्यात कायद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती