शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील वाद : एच. के. पाटील रविवारी थोरातांची भेट घेणार, मुंबईत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशीही चर्चा करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 06:36 IST

मुंबई भेटीत पाटील थोरातांची भेट घेणार आहेत. ‘हात से हात जोडो’ या अभियानाचा आढावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्याकडून घेणार आहेत.

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू असतानाच आणि त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रकाँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील येत्या रविवारी (१२ फेब्रुवारी) मुंबईत येत आहेत. 

मुंबई भेटीत पाटील थोरातांची भेट घेणार आहेत. ‘हात से हात जोडो’ या अभियानाचा आढावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्याकडून घेणार आहेत. संध्याकाळी राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, सुनील केदार, विजय वड्डेटीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या गोंधळावरून प्रदेश काँग्रेसमध्ये पटोले आणि थोरात वाद सुरू झाला. दुसरीकडे नागपूर विधानपरिषद निवडणुकीतील गोंधळावरून काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन पटोले यांच्याविरोधात  तक्रारही केल्याची चर्चा आहे. 

 थोरातांची नाराजी दूर करणार- पाटील यांच्या रविवारच्या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख ‘विधिमंडळ पक्षनेते’ असाच करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची जी चर्चा आहे, त्याबाबत काँग्रेसकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट होते. - थोरात यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पाटील या भेटीत करणार असून पटोले यांच्याबरोबर आपण काम करू शकत नाही, या थोरातांनी केलेल्या तक्रारीवरही आधी थोरातांशी आणि नंतर ज्येष्ठ नेत्यांबरोबर पाटील चर्चा करणार आहेत. - या बैठकीनंतर पाटील आपला अहवाल पक्षाच्या अध्यक्षांना पाठविण्याची शक्यता असून त्यानंतर पटोले-थोरात यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र