शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"पवार साहेबांचा पक्ष चोरून..."; पुण्यातल्या पुरावरुन मनसे-राष्ट्रवादीत जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 10:42 IST

Pune Flood : पुण्यातल्या पुरपरिस्थितीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला होता

Raj Thackeray : पुण्यात आलेल्या पुरामुळे एकीकडे लोकांचे प्रचंड नुकसान झालेलं असताना दुसरीकडे राजकारण सुरु झालं आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुराच्या घटनेवरुन प्रशासनावर निशाणा साधला. मुसळधार पावसानंतर पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे  एकतानगरी, निंबजनगर, विठ्ठलवाडी हे भाग पाण्याखाली गेले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. त्यावर राष्ट्रवादीने प्रत्युत्तर देताच मनसेने थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

पुण्यातल्या पावसाच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी पुणेकरांशी संवाद साधत पत्रकार परिषद घेतली. "एवढं पाणी सोडतील याची लोकांना कल्पनाही नव्हती. घरांमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मला वाटत शासनाने या गोष्टींचा विचार करायला हवा. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पुण्याला वेळ लागणार नाही. प्रशासनाचे नियोजन दिसून येत नाही. पुणे हे एक शहर नाही, पाच पाच शहरं झाली आहेत. राज्यामधली लोक भिका मागतात आणि बाहेरचे येऊन राहतात याला काही सरकार चालवणं म्हणतात का?," असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. यासह अजित पवारांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता.

राज ठाकरेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्षांवर शा‍ब्दिक हल्ला केला. दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण या सुपारीबहाद्दरांचं टोलनाक्याचं, भोंग्याचं किंवा इतर कोणतंही आंदोलन यशस्वी झालं नाही. आतापर्यंत सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

मिटकरींच्या या टीकेला मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गजानन काळे यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत भाष्य केलं आहे. "७० हजार कोटींचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी (हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.) तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय. अजितदादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राज ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर? हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी, मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू," असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. तसेच उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका. पक्ष चोरून पण १ खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची. ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले, असंही काळेंनी म्हटलं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"पाऊस पडणं आपल्या हातात नाही पण असा पाऊस  पडल्यानतंर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिग केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्याचे आहेत. ते नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं. त्यांनी यात लक्ष घालायला नको का?" असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेAmol Mitkariअमोल मिटकरी