शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

किसान मोर्चातून माओवाद डोकावतोय , पूनम महाजन यांचं वादग्रस्त वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 14:24 IST

भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी मोर्चेक-यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे

मुंबई : मजल दरमजल करत जवळपास 200 किमी पायपीट करून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च सोमवारी पहाटे 5 वाजता आझाद मैदानात धडकला. शेतकऱ्यांच्या या लाँगमार्चचे आज महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. सर्व विरोधकांनी मोर्चा संयमाने येत असल्याचे कौतूक केले. पण दुसरीकडे भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी मोर्चेक-यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेतक-यांच्या महामोर्चातून शहरी माओवाद डोकावतोय असं महाजन म्हणाल्या आहेत. मुंबईपर्यंत शांततेत आलेल्या या मोर्चाबद्दल एका मराठी वृत्त वाहिनीने भाजपा खासदार पूनम महाजन यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात असलेल्या लाल झेंड्याबद्दल आक्षेप घेतला. या आंदोलनातून शहरी माओवाद डोकावताना दिसत आहे. यामध्ये लाल झेंडे घेऊन शेतकरी निघाले आहेत.' असं पूनम महाजन म्हणाल्या.  खासदार महाजन यांच्या या वक्तव्याने आंदोलनाला नक्षली रंग देण्याचा प्रयत्न झाल्याची टीका होत आहे. पूनम महाजन यांनी शेतक-यांचा अपमान केला आहे, त्यांनी शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.   

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चPoonam Mahajanपूनम महाजनnaxaliteनक्षलवादी