कल्याण: बदलापूरात राहणारी तरुणी मृणाल जाधव हीने श्रीरामा बद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर टाकला होता. या प्रकरणी तिने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जाधव हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे जाधव हिचा मुक्काम आधारवाडी कारागृहात राहणार आहे.
२७ फेब्रुवारी रोजी जाधव हिने श्रीरामा बद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मिडियावर टाकला होता. हा व्हिडीओ पाहताच हिंदूत्ववादी संघटनांनी तिच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत तिच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी. तिला तातडीने अटक करावी अशी मागणी केली होती. बदलापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत जाधव हिला अटक केली होती. ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जाधव हिने प्रथम अंबरनाथ न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. तिचा अर्ज अंबरनाथ न्यायालयाने फेटाळून लावला होता. तिने पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी होती.
या प्रकरणी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष राणी जवळेकर यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या वतीने वकिल रेश्मा भोपी यांनी युक्तीवाद केला. जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी हिंदूत्ववादी संघटनाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी न्यायालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते. वकिल भोपी यांनी युक्तीवाद केला की, आरोपी जाधव हिला जामीन मंजूर केल्यास या प्रकरणातील तपास कामात हस्तक्षेप केला जाऊ शकतो. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत जाधव हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणातील फिर्यादी जवळेकर यांनी सांगितले की, २६ मार्च रोजी रामनवमी आहे. श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जाधव हिला न्यायालयाने जामीन नाकारल्याने हिंदूत्ववादी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.
Web Summary : Mrunal Jadhav's bail plea was rejected by Kalyan court after controversial remarks about Shri Ram. Hindu organizations protested the video, leading to her arrest. Her judicial custody continues.
Web Summary : श्री राम पर विवादास्पद टिप्पणी के बाद मृणाल जाधव की जमानत याचिका कल्याण कोर्ट ने खारिज कर दी। हिंदू संगठनों ने वीडियो का विरोध किया, जिसके कारण उनकी गिरफ्तारी हुई। उनकी न्यायिक हिरासत जारी है।