शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

वादग्रस्त सचिन वाझे अखेर निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 02:37 IST

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी रोजी सापडलेली स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ कार तसेच कारमधील धमकीच्या पत्राचा तपास वाझे यांच्याकडे देण्यात आला होता.

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे संशयाच्या घेऱ्यात अडकलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. एनआयएने वाझे यांना अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त यांनी निलंबनाचे आदेश दिले. (Controversial Sachin Waze finally suspended)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी रोजी सापडलेली स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ कार तसेच कारमधील धमकीच्या पत्राचा तपास वाझे यांच्याकडे देण्यात आला होता. तपास सुरू असतानाच ज्यांची ही कार हाेती ते ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांचा मुंब्रा, रेतीबंदर खाडीत ५ मार्चला मृतदेह आढळला. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी वाझे यांच्यावर संशय व्यक्त करून त्यांच्या अटकेबरोबर निलंबनाची मागणी केली होती. अखेर गृहमंत्र्यांनी हे प्रकरण राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाझेंच्या बदलीचे आदेश दिले.  

त्यानुसार, वाझेंची विशेष शाखेत बदली करून त्यांच्यावर नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली. शनिवारी एनआयएने  १३ तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना अटक केली. वाझे यांच्या करण्यात आलेल्या या अटकेनंतर सोमवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील कोल्हे यांनी सचिन वाझे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. यापूर्वी ख्वाजा युनूस प्रकरणात २००४ मध्ये सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू हाेता. ताे पूर्ण झाल्यानंतर अखेर  तब्बल १५ वर्षांनी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.  

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार