शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

तार्इंचेही योगदान महत्त्वाचे

By admin | Updated: July 19, 2016 01:44 IST

मुख्यमंत्र्यांनी तीन महिने कारवाईला स्थगिती दिल्यामुळे बंद मागे घेत असल्याची घोषणा आमदार मंदा म्हात्रे यांनी केली.

नवी मुंबई : मुख्यमंत्र्यांनी तीन महिने कारवाईला स्थगिती दिल्यामुळे बंद मागे घेत असल्याची घोषणा आमदार मंदा म्हात्रे यांनी केली. यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार होवू लागला आहे. परंतु प्रत्यक्षात सुशिक्षित व चळवळीतील तरूणांनी तार्इंमुळेच तीन महिन्यांची स्थगिती मिळाली व आंदोलनाची ठिणगी पेटल्याचे मान्य केले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामध्ये चार दिवसांमध्ये अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. शुक्रवारी महापालिकेने तुर्भेमधील गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवकांसह सर्वच ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. यानंतर शनिवारी आमदार मंदा म्हात्रे ग्रामस्थांचे शिष्टमंडळ घेवून आयुक्त तुकाराम मुंढे यांना भेटण्यासाठी मुख्यालयात गेल्या. परंतु आयुक्तांनी दालनाबाहेर ताटकळत ठेवल्याने त्यांनी थेट कार्यालयात प्रवेश केला. कारवाई किमान आठ दिवस थांबवा अशी विनंती केली. परंतु आयुक्तांनी आम्ही कारवाई करणारच अशी ठाम भूमिका घेतल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आयुक्तांच्या दालनाबाहेर पडून त्यांनी आंदोलनाचे आवाहन केले. सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली १८ जुलैला बंद करण्याचे मान्य केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तीन महिने कारवाईला स्थगिती दिल्याने त्यांनी बंद मागे घेत असल्याचे घोषित केले. बंद मागे घेण्याची घोषणा करताच इतर राजकीय पक्षांनी व उपस्थित नागरिकांनी तीव्र विरोध केला. यामुळे दत्तमंदिरमधील बैठकीमधून त्यांनी जाणे पसंत केले. यामुळे शनिवारी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या तार्इंना लगेच फुटिर घोषित करण्याची स्पर्धा सुरू झाली. त्यांच्याविरोधात संदेश सोशल मीडियातून पसरविण्याची स्पर्धा सुरू झाली. परंतु वास्तवामध्ये दोन महिन्यांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांसह शहरातील सर्व व्यावसायिक व हॉटेलमालक त्रस्त आहेत. मुंढेंनी धडक कारवाई सुरू केल्यामुळे त्यांना थांबवायचे कोणी, असा प्रश्न पडला होता. लोकप्रतिनिधींमध्येही मुंंढेंविरोधात जाहीर बोलण्याचे धाडस होत नव्हते. त्यावेळी मंदा म्हात्रे यांनी उघडपणे मुंढें विरोधात रणशिंग फुकले. त्यांनी पुढाकार घेताच शहरातील माथाडी नेते, व्यापारी प्रतिनिधी सर्वपक्षीयांनी तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सोबत असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात या आंदोलनाचे श्रेय त्यांना मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू होते. बंद मागे घेण्याच्या घोषणेमुळे विरोधकांना संधी मिळाली व त्यांनी तार्इंविरोधात मोहीम उघडली. सोशल मीडियामधून त्यांना मंदबाई म्हणण्यापर्यंत प्रतिक्रिया टाकण्यात आल्या. परंतु आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सुशिक्षित तरूणांनी मात्र तार्इंमुळे तीन महिन्यांचा दिलासा मिळाल्याचे मान्य करून अध्यादेश लवकर यावा यासाठी त्यांना विनंती करणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>तार्इंनी कोंडी फोडली नवी मुंबईमध्ये तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. २५ वर्षांमध्ये प्रथमच मार्जिनल स्पेसची दुकानदारी बंद केली. यामुळे हॉटेलसह अनेक व्यावसायिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. एपीएमसीमधील व्यापाऱ्यांवरही कारवाई केली. शहरात फक्त मुंढे नावाची चर्चा होती. त्यांच्याविरोधात कोणीतरी आंदोलन करावे असे सर्वांना वाटत होते. परंतु कोणीही धाडस करत नव्हते. हे धाडस मंदातार्इंनी दाखविले, त्यांच्यामुळे कोंडी फुटल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.