शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सामुदायिक विवाह सोहळ्यांना ‘नाम’चा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:58 IST

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणारी नाम फाउंडेशन आता सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठीही पुढाकार घेत आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक जिल्ह्याला सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी देण्याचा निर्णय नाम फाउंडेशनने घेतला आहे.

- गौरीशंकर घाळेमुंबई  - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणारी नाम फाउंडेशन आता सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठीही पुढाकार घेत आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक जिल्ह्याला सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी देण्याचा निर्णय नाम फाउंडेशनने घेतला आहे.आर्थिकदृष्टया हालाखीच्या परिस्थितीमुळे विवाहाची चिंता असणारा मोठा वर्ग आहे. पैशाअभावी शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलामलींची लग्ने राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात लग्नाच्या ओझ्यापायी मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही अनेकदा समोर आल्या आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न राज्य धर्मादाय आयुक्तालयाने सुरू केला आहे. धार्मिंक संस्था, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिल्हानिहाय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात नाम फाउंडेशनही सहभागी होईल. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी दिला जाईल. आवश्यकता भासल्यास राज्यभरातील समित्यांबाबत असा निर्णय घेण्याचीही तयारी ‘नाम’ने दर्शविली आहे.आयोजनासाठी समित्यांची स्थापनाधार्मिक, शैक्षणिंक संस्थांच्या सहयोगाने सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यासाठी राज्यभर जिल्हनिहाय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत नगर, दौंड, सोलापूर, शिर्डी, ठाणे आदी ठिकाणी या समित्यांच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मेपर्यंत अन्य समित्यांच्या माध्यमातूनही अशा प्रकारचे सोहळे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली. धार्मिक संस्थांकडे मोठ्या प्रमाणावर निधी जमा होतो. यातील काही निधी समाजातील वंचित घटकांसाठी वापरला जावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही डिगे यांनी सांगितले.फुलांची अक्षता : विशेष बाब म्हणजे अन्नधान्याची नासाडी टाळावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी फक्त व्यासपीठावर, जोडप्यांजवळ असणा-या व-हाडींनाचअक्षता दिल्या जाणार आहेत. स्टेजपासून लांब असणा-यांना अक्षता म्हणून फुले देण्याचानिर्णय समित्यांनी घेतला आहे. त्यामुळे विवाहसोहळ्यातील अन्नधान्याची नासाडीही थांबणार आहे.

टॅग्स :social workerसमाजसेवकMaharashtraमहाराष्ट्र