२५ हजार कोटींची १२ कंपन्यांना कंत्राटे

By यदू जोशी | Published: June 1, 2018 06:20 AM2018-06-01T06:20:56+5:302018-06-01T06:20:56+5:30

महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ६२३ किलोमीटरचे २५ हजार ९० कोटी रुपयांचे कंत्राट नामवंत १२ कंपन्यांना गुरुवारी देण्यात आले

Contracts 12 companies for Rs 25 thousand crore | २५ हजार कोटींची १२ कंपन्यांना कंत्राटे

२५ हजार कोटींची १२ कंपन्यांना कंत्राटे

Next

यदु जोशी
मुंबई : महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ६२३ किलोमीटरचे २५ हजार ९० कोटी रुपयांचे कंत्राट नामवंत १२ कंपन्यांना गुरुवारी देण्यात आले. त्यात रिलायन्स, एल अ‍ॅण्ड टी, जीव्हीपीआर आदी कंपन्यांचा समावेश आहे.
या महामार्गाचे कंत्राट एक-दोन कंपन्यांना देण्याऐवजी विविध १६ टप्पे करून ते विविध कंपन्यांना देण्याचे धोरण राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आखले आहे. महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी एमएसआरडीसीने ही भूमिका घेतली आहे. त्यातील १३ टप्प्यांची कामे १२ कंपन्यांना गुरुवारी देण्यात आली. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सहा तासांत कापता येणार आहे.
कोणत्या कंपनीला किती कोटी रुपयांचे आणि कोणत्या टप्प्याचे काम देण्यात आले आहे त्याची माहिती अशी : १) मेघा कंपनी १५९४ कोटी रु. - ० किलोमीटर ते ३१ किमी शिवमडका ते खडकी आमगाव (जि. नागपूर), २) अ‍ॅफकॉन्स २८७४.८० कोटी - ३१ किमी ते ८९.४१ किमी खडकी आमगाव ते पिंपळगाव (जि.वर्धा), ३) नॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनी ३००८.९९ कोटी - ८९.३० ते १६२.६६ किमी आष्टा ते वढोणा रामनाथ (जि. अमरावती), ४) पीएनसी लिमिटेड २०९९.५२ कोटी - १६२.६६ ते २१७.०२ किमी डोनद ते जनुना (जि. वाशिम), ५) सद्भाव कंपनी १६६५ कोटी - २१७.२३ ते २५९.९० किमी किन्ही राजा ते केणवद (जि.वाशिम), ६) अ‍ॅपको लिमिटेड - १२४६.५० कोटी - २५९.९० ते २९६ किमी बेलगाव ते पारडा (जि.बुलडाणा), ७) रिलायन्स - १९२६.९९ कोटी - २९६ ते ३४७.१९ किमी बांदा ते सावरगाव माल (जि.बुलडाणा), ८) मोन्टे कार्लो -१३८१.५० कोटी - ३४७.७२ ते ३९०.४४ किमी नाव्हा ते गेवराई (जि. जालना), ९) मेघा १९२२ कोटी - ३९०.४४ ते ४४४.४८ किमी बेंडेवाडी ते फतिवाबाद (जि. औरंगाबाद), १०) एल अ‍ॅण्ड टी २१४९ कोटी - ४४४.८४ ते ५०२.७५ किमी. फतिवाबाद ते सुराळा (जि. औरंगाबाद), ११) गायत्री प्रोजेक्टस् १३९३.९० कोटी - ५०२.६९ ते ५३२.०९ किमी. धोत्रे ते डेर्डे कºहाळे (जि.अहमदनगर), १२) दिलीप बिल्डकॉन १७५०.०५ कोटी - ५३२.०९ ते ५७७.७३ किमी पाठारे खुर्द ते सोनारी (जि. नाशिक), १३) बीएसी अ‍ॅण्ड जीव्हीपीआर संयुक्त कंपनी २०७९ कोटी - ५७७.७३ ते ६२३.३७ सोनारी ते तारांगणपाडा (जि. नाशिक).

सर्वांत कमी दराची निविदा असलेल्या कंपन्यांनाच काम देण्यात आले आहे. तथापि, प्रत्येक कंपनीला मूळ निविदा किमतीच्या ७.९२ ते २७.५५ टक्के जादा दराने कामे देण्यात आली आहेत. महामार्गाच्या गुणवत्तेत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने हा जादा दर द्यावा लागला असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
तीन टप्प्यांचे कंत्राट बाकी : या महामार्गाच्या उभारणीसाठी आणखी तीन टप्प्यांचे कंत्राट अद्याप देणे बाकी आहे. या टप्प्याचे अंतर केवळ ७८ किलोमीटरचे आहे.

Web Title: Contracts 12 companies for Rs 25 thousand crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.