आर्थिक अडचणीतून कंत्राटदाराची आत्महत्या
By Admin | Updated: February 14, 2017 03:53 IST2017-02-14T03:53:47+5:302017-02-14T03:53:47+5:30
आर्थिक अडचणीतून नैराश्य आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाण्यातील एका कंत्राटदाराने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या

आर्थिक अडचणीतून कंत्राटदाराची आत्महत्या
ठाणे : आर्थिक अडचणीतून नैराश्य आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाण्यातील एका कंत्राटदाराने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
वर्तकनगरातील वेदान्त सोसायटीमध्ये राहणारे युवराज हनुमंत जगदाळे (५६) गत काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. त्यांना २ मुले असून पत्नी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांना शाळेत सोडण्यासाठी गेली होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास त्या घरी परतल्या असता, हा प्रकार उघडकीस आला. जगदाळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.एल. बापकर यांनी सांगितले. जगदाळे यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबातून आर्थिक अडचणीचे कारण स्पष्ट झाले असल्याचे बापकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)