मुंबई - वनजमिनीचा अवैधरीत्या कब्जा करून ती जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करून त्याचा मोबदला घेणे कंत्राटदार जे. एम. म्हात्रेंना महागात पडले आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून १८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये नवी मुंबईतील उरण आणि उलवे परिसरातील तीन भूखंडांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, या वनजमिनीचा ताबा १९७५मध्ये महाराष्ट्र शासनाने घेतला होता आणि ती वनविभागाकडे वर्ग केली होती. तसेच या जमिनीच्या सातबाऱ्यावर आणि फेरफार नोंदणीतदेखील वनविभागाचे नाव नोंदवण्यात आले होते. मात्र, आरोपी म्हात्रे यांनी त्यात फेरफार करत त्यावर स्वतःचे नाव चढविल्याचा ठपका ‘ईडी’ने ठेवला आहे. त्यानंतर ही जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करून त्यातून ४२ कोटी ४० लाख रुपये मिळवले होते.
६९ कोटींच्या संपत्तीवर टाच वनजमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विकून आलेल्या पैशांतून आरोपी म्हात्रे यांनी आणखी मालमत्ता खरेदी केली. तसेच काही कर्जांचीही परतफेड केल्याचे ‘ईडी’च्या तपासात आढळले. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत ६९ कोटी ४७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
कोण आहेत जे. एम. म्हात्रे?पनवेलचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जे. एम. म्हात्रे आणि सय्यद महम्मद अब्दुल हमीद कादरी यांच्या विरोधात सप्टेंबर २०२४ मध्ये वनविभागाने पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वनखात्याची जमीन म्हात्रे आणि कादरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देऊन भूसंपादनापोटी ५२ कोटी रुपये घेतले होते. भूसंपादनाचे हे पैसे वनखात्याला द्यावेत म्हणून वनविभागाने तगादा लावूनही त्यांनी न जुमानल्याने अखेर उरण तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांनी तक्रार दाखल केली होती. जे. एम. म्हात्रे पूर्वी शेतकरी कामगार पक्षात होते. आता विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुत्र प्रीतम म्हात्रेंसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रीतम यांनी उरण मतदारसंघातून भाजपच्या महेश बालदी यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली हाेती.
हजारो कोटींची कंत्राटेनवी मुंबई, उरण-पनवेलसह राज्यात अनेक जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनीने सिडको, विमानतळ, नॅशनल हायवे काॅर्पाेरेशनसह एमएसआरडीसी आणि इतर प्राधिकरणांची हजारो कोटींची कंत्राटे घेतलेली आहेत. काही पूर्ण झाली आहेत, तर काही सुरू आहेत. काही कामे भाजप नेत्यांच्या कंपनीसोबत भागीदारीत सुरू आहेत.
Web Summary : BJP leader J.M. Mhatre faces money laundering charges for illegally acquiring forest land and selling it to the National Highways Authority for ₹42 crore. The ED seized ₹18 crore in assets, including land in Navi Mumbai. He previously entered BJP with his son after winning an election.
Web Summary : भाजपा नेता जे.एम. म्हात्रे पर वन भूमि पर अवैध कब्जा कर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण को 42 करोड़ रुपये में बेचने का आरोप है। ईडी ने नवी मुंबई में जमीन सहित 18 करोड़ रुपये की संपत्ति जब्त की। चुनाव जीतने के बाद वे अपने बेटे के साथ भाजपा में शामिल हुए।