अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार

By Admin | Updated: May 18, 2017 00:34 IST2017-05-18T00:34:00+5:302017-05-18T00:34:00+5:30

खंडाळा येथे चौदा वर्षीय मुलीवर पाच ते सहा महिने सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

Continued rape of minor girls | अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार

- लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर (अहमदनगर) : खंडाळा येथे चौदा वर्षीय मुलीवर पाच ते सहा महिने सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात येणार आहे.
खंडाळा येथे नवलशेठ यांच्या शेतीमध्ये रामराव गिरणारे कामगार आहे. या शेतात खंडाळा गावातील पीडित मुलगी पाणी घेण्यासाठी आली असताना तिला नारळ देण्याचे आमिष दाखवून मक्याच्या शेतात नेत रामराव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तोंड न उघडण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर नराधम रामराव पुन्हा पुन्हा धमकावून तिच्यावर शेतात अत्याचार करीत होता. दरम्यान, हा प्रकार दोघा अल्पवयीन आरोपींनी पाहिला. त्यानंतर या दोघांनी मुलीला एकटी गाठून ‘तुझ्या आजोबांना सांगू’, अशी धमकी देत घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून हे अत्याचार सुरू होते. पीडित मुलीचे पोट दुखू लागल्याने आईने तिला श्रीरामपूर येथे रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.

Web Title: Continued rape of minor girls