शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'ती'चे WhatsApp स्टेटस वारंवार पाहणेही विनयभंगच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:37 IST

व्हॉटसअॅपसारख्या समाजमाध्यमावर एखाद्या मुलीने तिचे स्टेटस बदलले की, लगेच पाहणे म्हणजे तिच्यावर चोरून नजर ठेवण्यासारखेच आहे.

- बापू सोळुंके

औरंगाबाद : व्हॉटसअॅप, फेसबुक या समाजमाध्यमांवर एखादी स्त्री अथवा मुलीने टाकलेले स्टेटस वारंवार पाहणे हा विनयभंगाचाच प्रकार आहे. कायद्यानुसार हा गुन्हा ठरतो, असे स्पष्ट मत प्रभारी पोलीस आयुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी व्यक्त केले. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार आणि जिवंत जाळल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील महिला पत्रकारांनी खाटमोडे यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शहरातील महिला आणि तरुणी रात्री-अपरात्री कामावरून घरी परततात. हैदराबादेतील घटनेमुळे शहरातील स्त्रियांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

पत्रकारांशी बोलताना खाटमोडे म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कडक कायदे अस्तित्वात आले आहेत. मुली अथवा महिलांकडे एकटक पाहणे, पाठलाग करणे गुन्हा ठरतो. विशेष म्हणजे हे सर्व करताना त्या व्यक्ती महिलेशी कोणतीही आगळीक केलेली नसली तरी तो सहज आतमध्ये जाऊ शकतो. एवढेच नव्हे, तर व्हॉटसअॅपसारख्या समाजमाध्यमावर एखाद्या मुलीने तिचे स्टेटस बदलले की, लगेच पाहणे म्हणजे तिच्यावर चोरून नजर ठेवण्यासारखेच आहे. अथवा तिचा चोरून पाठलाग करण्यासारखे ठरते आणि याला आता कायद्याने गुन्हा ठरविले आहे.

तसेच कोणत्याही तरुणीने त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार करण्यासाठी सहज पढे आले पाहिजे. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास गुन्हेगाराचे धाडस वाढते आणि नंतर नको ते प्रकार घडतात. पीडिता ही तक्रार करण्यासाठी जेव्हा पोलिसांकडे जाते तेव्हा तिला तिचे नाव प्रकाशित होईल, याची भीती वाटते. तिला संबंधितांना धडा शिकवायचा असतो, अशावेळी आम्ही बऱ्याचदा निनावी तक्रार लिहून घेऊन संबंधितांना अद्दल घडवितो. असेही खाटमोडे म्हणाले.

भादंवि ३५४(ड) मध्ये होते ३ वर्षाची शिक्षाभादंवि कलम ३५४ (ड) या कलमानुसार कोणत्याही स्त्रीचा चोरुन पाठलाग करणे गुन्हा ठरतो. स्त्रीला स्पर्श न करता केवळ तिचा कोणीतरी गुपचूप पाठलाग केल्याने तिला भीती वाटल्याने हा गुन्हा ठरविण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर चोरून नजर ठेवल्याच्या आरोपाखाली भादंवि ३५४ (ड) मध्ये आरोपीला पहिल्या गुन्ह्यासाठी ३ वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद आहे, तर दुसरयांदा हाच गुन्हा केल्यास आरोपीला ५ वर्षे शिक्षा आणि दंड ठोठावण्याची कायद्यात तरतूद आहे.