कंटेनर-ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर
By Admin | Updated: November 14, 2014 23:06 IST2014-11-14T23:06:07+5:302014-11-14T23:06:07+5:30
अकोल्यानजिकची घटना.

कंटेनर-ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर
बाभूळगाव जहाँगिर (अकोला): भरधाव ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक ठार, तर ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर अकोलानजिक असलेल्या बाभूळगाव जहागिर येथे घडली.
अकोला येथील बालाजी ट्रान्सपोर्ट कंपनीचा एमएच २0-७१४४ क्रमांकाचा ट्रक नागपूर येथून औषधी साहित्य घेऊन अकोल्याकडे येत होता. अकोल्याहून अमरावतीकडे स्फोटक पावडर घेऊन जात असलेल्या जीजे 0९ एव्ही ३३२0 क्रमांकाच्या कंटेनरने बाभूळगाव जहांगिरनजीकच्या वळणावर ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, ट्रकच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. यात कंटेनर चालक जागीच ठार झाला, तर ट्रक चालक भानुप्रताप ठाकूर (रा. कैलास टेकडी, अकोला) हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहि ती मिळताच सिव्हिल लाइन्श पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, जखमीस अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात हलविले. या अपघातानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दीड तास वाहतूक ठप्प पडली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालकाचा मृतदेह कंटेनरच्या केबीनमध्येच पडून होता.
*मोठा अनर्थ टळला
अपघातग्रस्त कंटेनर स्फोटक पावडर घेऊन जात होता. अपघात झाल्यानंतर कंटेनरच्या समोरच्या भागातून धूर निघत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या बंबाने कंटेनरवर पाण्याचा वर्षाव केल्याने आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.