कंटेनर पलटला, महामार्ग विस्कळीत

By Admin | Updated: June 30, 2016 02:05 IST2016-06-30T02:05:35+5:302016-06-30T02:05:35+5:30

भरधाव कंटेनर बुधवारी रस्त्याच्या मधोमध उलटल्याने पूर्व द्रुतगती महामार्ग तब्बल चार तास ठप्प झाला.

Container reversed, highway disrupted | कंटेनर पलटला, महामार्ग विस्कळीत

कंटेनर पलटला, महामार्ग विस्कळीत


मुंबई : भरधाव कंटेनर बुधवारी रस्त्याच्या मधोमध उलटल्याने पूर्व द्रुतगती महामार्ग तब्बल चार तास ठप्प झाला. घाटकोपरच्या कामराज नगर येथे हा कंटेनर उलटला. कंटेनर हटवण्यासाठी तत्काळ मदत न मिळाल्याने मार्ग ठप्प झाला.
ठाण्यावरून हा कंटेनर पहाटे पाचच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या दिशेने येत होता. घाटकोपर येथे चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे हा कंटेनर दुभाजकावर चढून महामार्गाच्या मधोमध उलटला. पहाटेची वेळ असल्याने महामार्गावर वाहतूक कमी होती. त्यामुळे मोठा अपघात टळल्याची माहिती काही स्थानिक रहिवाशांनी दिली.
तसेच चालकानेदेखील सावधगिरीने उडी मारल्याने त्याला दुखापत झाली नाही. मात्र या मार्गावर बराच वेळ वाहतूक ठप्प होती. अखेर सकाळी आठच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने कंटेनरला बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. (प्रतिनिधी) हामार्ग ठप्प

Web Title: Container reversed, highway disrupted