११ कोटींचे काम एजंटला देण्यासाठी बांधकाम मुख्य अभियंत्याची धडपड

By Admin | Updated: August 21, 2014 01:06 IST2014-08-21T01:06:14+5:302014-08-21T01:06:14+5:30

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे ११ कोटींचे काम आपल्या मर्जीतील कंत्राटदार तथा एजंटला मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याची धडपड सुरू आहे.

Construction of the Chief Engineer's task to give an agent of 11 crores to the agent | ११ कोटींचे काम एजंटला देण्यासाठी बांधकाम मुख्य अभियंत्याची धडपड

११ कोटींचे काम एजंटला देण्यासाठी बांधकाम मुख्य अभियंत्याची धडपड

अकोला जिल्ह्यातील रस्ता : वीज निर्मिती कंपनीचा निधी, निकषांना बगल
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे ११ कोटींचे काम आपल्या मर्जीतील कंत्राटदार तथा एजंटला मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे त्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या या कामातील काही अटी शिथील करण्यात आल्या आहेत.
पारस येथे वीज निर्मिती कंपनीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अ‍ॅश बँडमुळे अकोला जिल्ह्यातील बाळापूर ते शेगाव या सुमारे पाच किलोमीटरच्या वळण रस्त्याचे काम केले जाणार आहे. या मार्गावर दोन पूलही उभारायचे आहेत. या कामासाठी वीज निर्मिती कंपनीने सार्वजनिक बांधकाम खात्याला ११ कोटी रुपये देण्याचे कबूल केले आहे. यातील ५० टक्के रक्कम बांधकाम खात्याकडे डिपॉझिटही करण्यात आली.
११ कोटींच्या या वळण रस्त्याच्या कामाची निविदा काढली गेली. हे काम आपल्या बापू नामक कंत्राटदार तथा एजंटला मिळावे म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. काम मोठे असल्याने त्यासाठी निकष व अटीही तेवढ्याच कठोर आहेत. त्यामुळे या एजंटची अडचण होवू लागली आहे. अनेक निकषात हा एजंट बसत नाही. म्हणून हे निकषच बाद ठरविण्याची तयारी सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत बापूला काम मिळवून द्यायचेच, असा निर्धार मंडपे यांनी केल्याचे दिसून येते.
अमरावती विभागातील शासकीय कंत्राटदारांना बांधकाम साहित्याचे दर वाढवून हवे आहेत. मात्र त्यातही २० टक्के दरवाढीसाठी ‘डिलींग’चा प्रस्ताव असल्याची चर्चा बांधकाम यंत्रणेत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
ंकोण आहे हा बापू ?
मुख्य अभियंता पी. एस. मंडपे यांचा एजंट असलेला हा बापू अकोला जिल्ह्यातील आहे. यापूर्वी तो अकोल्याच्या तत्कालीन अधीक्षक अभियंत्याचा एजंट म्हणून वावरत होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून वावरणारा बापू दिवसभर नियमित मुख्य अभियंत्यांच्या कक्षाबाहेर वावरताना दिसतो. त्याच्या इशाऱ्यावरच तेथील कामकाज सुरू असल्याचे बोलले जाते. मंडपेंना मीच अमरावतीत आणले, हे जाहीररीत्या सांगण्याची हिंमत बापू करतो, यावरून त्यांचे किती सख्य आहे ते स्पष्ट होते. मुळात बापूच्या नावाने एक कन्स्ट्रक्शन कंपनी रजिस्टर्ड आहे. त्यावर त्याने अनेक कामेही घेतली. याच कंपनीच्या नावे आता ११ कोटींचा कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न आहे. मुळात बापू हा अकोल्यातील एका बड्या कंत्राटदाराकडे मुकादम म्हणून काम करीत होता. आजही या कंपनीच्या रेकॉर्डवर टेक्निकल वर्कसाठी बापूचेच नाव नोंदलेले आहे. प्रतिसाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मंत्रालयापर्यंत तक्रारी करण्यात बापूचा हातखंडा आहे. दोन आठवड्यांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील एका काँग्रेस आमदाराला मंडपेंच्या अनुपस्थितीमुळे परत जावे लागले होते. त्यावेळी संतापलेल्या या आमदाराला ‘शांत’ करण्यासाठी बापूनेच पुढाकार घेतला. बापूने मंडपेंना आमदारांच्या दरबारात पेश केले. याच आमदाराच्या कार्यक्षेत्रातील केंद्रीय रस्ते विकास निधीची निविदा मंडपे यांनी एक महिना प्रलंबित ठेवली होती. मात्र आमदार भडकताच ती जुन्या तारखेत मंजूर करून दिली, हे विशेष.

Web Title: Construction of the Chief Engineer's task to give an agent of 11 crores to the agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.