शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घटनात्मकदृष्ट्या मराठा आरक्षण देऊ शकत नाही, तरी...; जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:08 IST

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी सत्ता गेली तरी बेहत्तर शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले असं आव्हाडांनी म्हटलं.

शिर्डी - Jitendra Awhad on Reservation ( Marathi News ) घटनात्मकदृष्ट्या मराठा आरक्षण देऊ शकत नाही. हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं?. त्यांचे कायदेशीर सल्लागार, महाधिवक्ते हे मुख्यमंत्र्यांना सल्ले द्यायला असतात. मग घटनेनुसार मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकत नाही हा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला नव्हता?. दुसरीकडे ओबीसी आरक्षण कापण्याचा प्रश्न येतोच कुठे? कारण ते घटनेने मंजूर केलेले आरक्षण आहे. मग भुजबळांना इतकं बोलायला कुणी लावलं?. छगन भुजबळ हे या त्रिकुट राजकारणाचे बळी पडलेत असं आज ओबीसी समाज बोलतोय. ओबीसींच्या मनात कधीही मराठ्यांबद्दल पाप नव्हते. हे पाप तुम्ही त्यांच्या मनात आणलं असा घणाघात करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला थेट प्रश्न विचारले आहेत. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसींच्या ३४७ जाती आहेत. त्यांना एकत्र करून तुम्ही महाराष्ट्राचं कुरुक्षेत्र करायचं ठरवलंय का? रक्ताचा सडा पाडायचा होता का? मग अचानक तुम्ही यू टर्न का घेतला?. तुम्ही कॅबिनेटमध्ये आहात. जे कॅबिनेटमध्ये बोलायचे ते तुम्ही रस्त्यावर बोलत होते. कॅबिनेट मंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही. सर्व जातीधर्मांना सोबत एकत्र घेऊन चालणारा कॅबिनेट मंत्री असावा लागतो. परंतु कुणीतरी तुमच्या तोंडावाटे बोलत होते हे आता महाराष्ट्राला कळतंय. भुजबळांकडून ही अपेक्षा नव्हती. का लावायची ही भांडणे?. जानेवारी २०२४ पर्यंत आरक्षण देऊ शकत नाही हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते का?. मग कशाला पाया पडण्याची नाटकं करायची?. राजकारणात स्पष्टता असायलाच पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी सत्ता गेली तरी बेहत्तर शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले. ओबीसीला राजकीय मान्यता कुणी दिली तर शरद पवारांनी दिली. ओबीसीला महाराष्ट्रात न्याय देण्याचे काम आंबेडकरांनंतर कुणी केले असेल तर ते शरद पवारांनी केले आहे. ओबीसीला आरक्षण मिळाले पाहिजे हे आंबेडकरांनी घटनेत लिहून ठेवले. जो सर्वात मागासलेला आहे तो ओबीसी. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आंबेडकरांनी घेतली. त्यासाठी प्रसंगी राजीनामा दिला. मंडल कमिशनला मान्यता दिली. त्यानंतर या मंडल कमिशनला मान्यता देशात सर्वात आधी महाराष्ट्राने केली. तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. भाजपा जातीयवादाच्या बाजूने असल्याने आरक्षण नको अशी त्यांची भूमिका आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.

दरम्यान, शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून लांब ठेवण्याचं काम कुणी केले?, फुलेंना मारण्याचा कट कुणी केला?, फुले दाम्पत्यावर शेण, गोटे, दगडे मारण्याचे काम कुणी केले?, शाहू महाराजांची हत्या करण्याचा निर्णय कुणी घेतला? शाहू महाराजांना सर्वात जास्त त्रास कुणी दिला? आंबेडकरांना शाळेतही बसू दिले नाही हे कुणी केले? पण या सगळ्यांचा बाप असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला दिला. संविधान साधी गोष्ट नाही. केवळ पुस्तक म्हणून बघू नका. संविधान हे कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा मोठे आहे असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीSharad Pawarशरद पवार