शाळांमध्ये बुधवारी संविधान दिन
By Admin | Updated: November 23, 2014 01:40 IST2014-11-23T01:40:08+5:302014-11-23T01:40:08+5:30
भारतीय संविधान दिनानिमित्त बुधवार, 26 नोव्हेंबरला राज्यातील शाळांत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करावे.

शाळांमध्ये बुधवारी संविधान दिन
मुंबई : भारतीय संविधान दिनानिमित्त बुधवार, 26 नोव्हेंबरला राज्यातील शाळांत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करावे. तसेच अंधश्रद्धा निमरूलनाबाबत विद्याथ्र्यात शिक्षकांनी जागृती करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये शालेय जीवनात विद्याथ्र्याच्या मनावर बिंबवणो आणि त्यांना देशाचे जागरूक नागरिक बनविणो यासाठी शाळांमध्ये संविधान दिन साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. या दिवशी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन व्हावे, संविधान यात्र काढण्यात यावी, संविधानावर आधारित प्रश्नमंजूषा, चित्रकला, स्लोगन, पोस्टर्स, समूहगान आदी स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे, असे या आदेशात नमूद आहे. विद्याथ्र्यासाठी संविधानाची प्रत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)