कॉन्स्टेबल भरती लेखी परीक्षेत एकाला भोवळ

By Admin | Updated: July 21, 2014 03:37 IST2014-07-21T03:37:58+5:302014-07-21T03:37:58+5:30

मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदासाठीची लेखी परीक्षा आज शहर व उपनगरातील विविध परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे पार पडली

Constable recruitment | कॉन्स्टेबल भरती लेखी परीक्षेत एकाला भोवळ

कॉन्स्टेबल भरती लेखी परीक्षेत एकाला भोवळ

मुंबई : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदासाठीची लेखी परीक्षा आज शहर व उपनगरातील विविध परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे पार पडली. मात्र गोरेगाव येथील परीक्षा केंद्रामध्ये पेपर सोडवित असलेल्या उमेदवार वर्गात भोवळ येऊन पडल्याने त्या ठिकाणी काही काळ गोंधळ उडाला. योगेश गवळी असे त्याचे नाव असून, त्याला गोरेगावातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, २५७० जागासाठी राज्यभरातील ३४ हजार २०० उमेदवारांनी विविध ८७ ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल २८ जुलैपर्यत जाहीर होणार आहे. गोरेगावातील गोरेगावनगर इंग्लिश स्कूल येथील परीक्षा केंद्रावरील उमेदवार योगेश गवळी (रा. बेलापूर सीबीडी) पेपर सोडवित असताना पावणेबाराच्या सुुमारास भोवळ येऊन खाली पडला. केंद्रावरील पोलिसांनी त्याला तातडीने नजीकच्या सिद्धार्थ रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती सुखरुप असून उद्या डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धावण्याच्या स्पर्धेप्रमाणे बंदिस्त खोलीतील पेपरवेळी उमेदवाराला चक्कर आल्याने परीक्षा केंद्रावर चर्चेचा विषय बनून राहिला. (प्रतिनिधी)

Web Title: Constable recruitment