शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

"माझ्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र, परंतु त्याचं टायमिंग चुकले अन्...; सदाभाऊंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 14:31 IST

राष्ट्रवादीकडून सतत होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे सदाभाऊ पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मुंबई - रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या सांगोला दौऱ्यावेळी गोंधळ घडला. पंचायत समितीच्या कार्यक्रमात गेलेल्या खोत यांना एका हॉटेल मालकानं अडवलं. २०१४ मध्ये खोत यांच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलचं बिल थकवल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर आता सदाभाऊ खोत यांनी वेगळाच दावा केला आहे. 

सदाभाऊ खोत म्हणाले की, ज्या व्यक्तीनं मला अडवले त्याला विचारलं असता, त्या व्यक्तीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान आपले कार्यकर्ते माझ्या हॉटेलात जेवून गेले मात्र अद्याप बिलाची रक्कम चुकती केलेली नाही अशी अस्पष्ट आणि अपुरी माहिती पुरवली. खोलवर विचारणा केली असता सदर व्यक्तीने आपलं नाव अशोक शिनगारे असल्याचं सांगितलं. मात्र ह्याबाबत कोणतीही ठोस माहिती तो देऊ शकला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान माझा कोणताही कार्यकर्ता अथवा प्रचारक साधा हॉटेलात चहासुद्धा पित नव्हता कारण आमच्याकडे पैसे नव्हते. मग हजारो रुपयांचं हॉटेलचं बिल होणं अशक्य आहे असं सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावला. 

त्याचसोबत असं काहीतरी कुंबाड रचायचं आणि त्यानंतर हल्ला करायचा असा त्यांचा एकंदरीत प्लॅन होता. परंतु त्याचं टायमिंग चुकले आणि आम्ही लवकर आलो. तो बराच वेळ नुसताच कुबांड रचून एकच गोष्ट दहा वेळा सांगत होता. हल्ला करायला लोक येणार होते ते लवकर येत नव्हते, त्यामुळे त्याला जी स्क्रिप्ट दिली होती ती पुन्हा पुन्हा सांगत होता. म्हणून हा हल्ला का झाला तर भाऊंनी पैसे दिले नाहीत म्हणून या कार्यकर्त्यांनी सदाभाऊवर हल्ला केला असे त्यांना चित्र महाराष्ट्रभर घालवायचं होतं. ह्या घटनेमागची सत्यता पडताळता डोळ्यासमोर जे आलं ते मात्र अवस्थ राजकीय वातावरणातून कुणीतरी केलेलं षडयंत्र असल्याचा दावा सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी केला. 

बिलाचे पैसे कधी देणार?; हॉटेलमालकाने सदाभाऊंना रस्त्यात अडवलं, नेमकं काय घडलं? 

अडवणाऱ्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी - खोत  राष्ट्रवादीच्या टॉमोटोसारख्या गालांच्या नेत्याच्या सांगण्यावरून हा हॉटेल मालक बनाव करत असल्याचं सांगत ह्या व्यक्तीच्या गुन्हयाचा पाढाच खोत यांनी मिडिया समोर वाचला. ३/४/२०२१ रोजी लिमिटेशन ऍक्ट खाली आणखी एक गुन्हा दाखल आहे. महाकाली सहकारी साखर कारखाना कवठे महाकाळ चा IPC  १३८ खाली गुन्हा दाखल आहे. जयहिंद पतसंस्थेचा IPC  १३८ खाली गुन्हा दाखल आहे. असे तब्बल सहा सात गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो वाळूमाफिया आहे. तो दारूविक्रेता आहे ही सगळी माहिती समोर आली. हा राष्ट्रवादीचा भामट्या एवढयावरच थांबला नसून त्याने सिद्धू शिंदे, रा. काळेवाडी, ता आटपाडी, जि. सांगली यांच्या बंगळुरू येथील सोन्याच्या दुकानातून १४ किलो सोने चोरल्याबद्दल देखील गुन्हा नोंद आहे. अशा व्यक्तीची कसून चौकशी करून त्याची मागील गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून त्यावर तात्काळ कारवाई करावी. परंतु पोलीस देखील गुन्हा नोंद करायला तयार नसल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या मागे कुणाचा तरी हात आहे असा आरोप सदाभाऊंनी केला. 

खरा चेहरा जनतेसमोर आणणारराष्ट्रवादीकडून सतत होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे सदाभाऊ पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबीयांकडून मला धोका आहे. "तुम्ही असे हल्ले करून आणि कुबांड रचून आम्हाला जीवनातून उठवू शकत नाही." हा संघर्ष आता तीव्र होईल आणि गावगाड्यातील माणसांना एकत्र घेऊन ह्याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल. गुन्हेगारांना पुढे घालून जर हल्ला कराल तर सदाभाऊ खोत त्याच्या बापांचा बाप आहे. भविष्यात "आरे ला कारे" म्हणूनच उत्तर दिले जाईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिला. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत NCPराष्ट्रवादी काँग्रेस