रक्तदान शिबीरातून ८५० बाटल्या संकलीत
By Admin | Updated: December 24, 2014 09:20 IST2014-12-24T02:28:52+5:302014-12-24T09:20:58+5:30
टॉपवर्थ ग्रुप कंपनीचे अध्यक्ष अभय लोढा यांच्या वाढदिवसानिमित्त १९ डिसेंबरला कंपनीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबीरातून ८५० बाटल्या संकलीत
मुंबई : टॉपवर्थ ग्रुप कंपनीचे अध्यक्ष अभय लोढा यांच्या वाढदिवसानिमित्त १९ डिसेंबरला कंपनीत रक्तदान शिबीराचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी ८५० बाटल्या रक्तदान करण्यात आले. कंपनीच्या खोपोली, नागपूर, दूर्ग, अहमदाबाद येथील कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांनीही रक्तदानात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक सुरेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार व्यवहारे यांनी परिश्रम घेतले. रक्तदान करून कर्मचाऱ्यांनी समाजास योगदान दिले. त्याचा लाभ अनेक गरजूंना होणार असल्याचे वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभय लोढा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)