शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भगूर येथील सावरकरांच्या निवासस्थानाचे होणार संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 03:12 IST

संवर्धनाची विशेष मोहीम; सावरकर स्मारकाकडे सरकारने दिले देखभालीचे दायित्व

मुंबई : नाशिकच्या भगूर येथील स्वातंत्र्यवीरांचे जन्मस्थान असलेल्या निवासस्थानाच्या देखभालीचे दायित्व महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडे दिले आहे. राज्य शासनाच्या संरक्षित योजनेअंतर्गत आता त्याचे संवर्धन करण्यात येणार आहे.राज्य शासनाच्या वतीने प्राचीन स्मारकांचे संवर्धन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र-वैभव - राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेनुसार स्वातंत्र्यवीरांचे भगूर येथील निवासस्थान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सुपूर्द करण्याची मागणी शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार नियमानुसार सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची क्षमता स्मारकाचीच असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे १२ जून २०१९ या दिवशी शासकीय अध्यादेश प्रकाशित करण्यात आला. या अध्यादेशानुसार लवकरच करारनाम्यावर स्वाक्षरी होऊन अधिकृतपणे स्मारकाच्या वतीने तिथे काम करण्यास सुरुवात होणार आहे.स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर हे स्वत: स्वातंत्र्यवीरांचे नातू आहेत. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रप्रेमींचे श्रद्धास्थान असलेली ही वास्तू परत त्यांच्या वारसाकडे येत आहे, हा खरोखरच दुग्धशर्करा योग आहे. यामुळे स्मारकाच्या कार्याला अधिक बळकटी येणार आहे.निवासस्थानाचा लौकिक सर्वदूर पोहोचविणारया ठिकाणी राष्ट्रप्रेमी नागरिकांना अपेक्षित असलेले कार्य, तसेच उपक्रम निश्चितपणे राबविले जातील, तसेच या निवासस्थानाचा लौकिकदेखील सर्वदूर पोहोचविला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे, अशी भावना स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर