शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

राज्यातही काँग्रेसचा ‘राजस्थान पॅटर्न’? नाना पटोले म्हणाले, मी दिल्लीत गेलो होतो, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 12:20 IST

नाना पटोले म्हणाले, मी दिल्लीत गेलो होतो पण या विषयासाठी नाही, मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य होईल.

मुंबई : राजस्थानमध्ये ज्याप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्यांचे राजीनामे घेऊन नव्याने मंत्रिमंडळ तयार केले, त्याच पद्धतीने काही धक्कादायक निर्णय महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने घेतले जातील. हिवाळी अधिवेशनाच्या आधी हे बदल करावेत, असा काँग्रेसने आग्रह धरल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद देण्यावरून चर्चा सुरू आहे. त्याच वेळी विधानसभेचे अध्यक्षपद भरण्यासाठीची चर्चा देखील पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.

नाना पटोले म्हणाले, मी दिल्लीत गेलो होतो पण या विषयासाठी नाही, मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य होईल. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही मंत्र्यांना दिल्लीत बोलावून पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी चर्चा करत आहेत. सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळातील काही सदस्यांना पक्षाची जबाबदारी दिली जाईल. तर काहींना मंत्रिपद, असे सांगण्यात येत आहे. पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद देतानाच मंत्रिपदही दिले जाईल, असा शब्द श्रेष्ठींनी दिला होता. त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागेल असे सांगण्यात येते. त्यासाठी त्यांचाही आग्रह आहे. 

त्याशिवाय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जामंत्री नितीन राऊत, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्यातही काही बदल केले जातील, असे सांगितले जाते. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीने आधीच जाहीर केले आहे. भोरचे आमदार संग्राम थोपटे  यांचे नाव अध्यक्षपदासाठी  सुचविले होते. मात्र  त्यावर पक्षाने निर्णय घेतला नव्हता. 

अधिवेशन मुंबईतचपुढच्या आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक अपेक्षित आहे, असे विधिमंडळातील अधिकाऱ्यांचे मत आहे. अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच घेण्याचा आग्रह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही धरला आहे. २० डिसेंबरच्या दरम्यान एक आठवड्याचे अधिवेशन मुंबईतच पार पडेल. त्याआधीच काँग्रेसला हे बदल करून हवे आहेत, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेPraniti Shindeप्रणिती शिंदे