विरोधीपक्षनेतेपदावरून केडीएमसीत काँग्रेसचा राडा

By Admin | Updated: August 21, 2015 01:21 IST2015-08-21T01:21:18+5:302015-08-21T01:21:18+5:30

विरोधीपक्षनेतेपदावरून केडीएमसीच्या महासभेत काँग्रेसने गुरुवारी गोंधळ घातला. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले नगरसेवक विश्वनाथ राणे

Congress's Rada in KDMC on anti-opposition | विरोधीपक्षनेतेपदावरून केडीएमसीत काँग्रेसचा राडा

विरोधीपक्षनेतेपदावरून केडीएमसीत काँग्रेसचा राडा

डोंबिवली : विरोधीपक्षनेतेपदावरून केडीएमसीच्या महासभेत काँग्रेसने गुरुवारी गोंधळ घातला. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले नगरसेवक विश्वनाथ राणे हे अद्यापही विरोधीपक्षनेतेपद कसे काय भूषवू शकतात? या मुद्द्यावर काँग्रेसच्या १४ नगरसेवकांनी जोरदार घोषणा-नारेबाजी केली.
राणेंना त्या पदावरून हटवा आणि पक्षाचे नगरसेवक उदय रसाळ यांच्याकडे तो पदभार द्या, अशी ही गोंधळी नगरसेवकांची प्रमुख मागणी होती. महापौर कल्याणी पाटील यांनी ती न मान्य
केल्याने स्वीकृत नगरसेवक नवीन सिंग आक्रमक झाले आणि त्यांनी राणेंना धक्काबुक्की केली.
विरोधक ऐकत नसल्याने महापौरांनी १० मिनिटे सभागृह तहकूब केले, परंतु त्यानंतरही ते आक्रमकच राहिल्याने सुरक्षा रक्षकांना बोलावत त्या गोंधळी नगरसेवकांना बाहेर काढण्याचे आदेश त्यांनी दिले. तीच वेळ साधत सिंग यांनी राणेंना लक्ष्य करत धक्काबुक्की केली. दरम्यान, अशा गोंधळाच्या वातावरणातच ४५ विषयांना मंजुरी देत सभा आटोपली.

Web Title: Congress's Rada in KDMC on anti-opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.