सुधारणांना काँग्रेसचा विरोध

By Admin | Updated: August 31, 2015 00:40 IST2015-08-31T00:40:13+5:302015-08-31T00:40:13+5:30

भूमी अधिग्रहण विधेयकात सुचविलेल्या सुधारणांना काँग्रेसने केवळ राजकारणापोटी विरोध केला. संबंधित विधेयक शेतकऱ्यांचे हित साधणारे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा

Congress's opposition to reforms | सुधारणांना काँग्रेसचा विरोध

सुधारणांना काँग्रेसचा विरोध

नागपूर : भूमी अधिग्रहण विधेयकात सुचविलेल्या सुधारणांना काँग्रेसने केवळ राजकारणापोटी विरोध केला. संबंधित विधेयक शेतकऱ्यांचे हित साधणारे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अध्यादेश आणला जाणार नाही, असे स्पष्ट करीत १३ शिफारशी स्वीकारल्या आहेत. त्या लागू करण्याचा निर्णय आता राज्य सरकारला घ्यायचा आहे. मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसची दुटप्पी भूमिकाही उघड झाली आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
काँग्रेसच्या भूमिकेमुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहील. जमिनीअभावी सिंचन प्रकल्प होणार नाही. भूमी अधिग्रहण विधेयकावर खुली चर्चा करण्याची व आलेल्या सूचना स्वीकारण्याची तयारी पंतप्रधानांनी दर्शविली होती. मात्र काँग्रेसने खऱ्या अर्थाने या विधेयकावर राजकारण केल्याचा आरोपही गडकरींनी केला.

Web Title: Congress's opposition to reforms