काँग्रेसच्या मुखपत्रातून स्वपक्षीयांवर टीकेची झोड
By Admin | Updated: December 28, 2015 12:20 IST2015-12-28T11:37:14+5:302015-12-28T12:20:50+5:30
काँग्रेस पक्ष आज आपला १३१वा स्थापना दिवस साजरा करत असताना मुंबई काँग्रेसच्या 'काँग्रेस दर्शन' या मुखपत्रातून स्वपक्षीय नेत्यांवरच टीकेची झोड उठवण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

काँग्रेसच्या मुखपत्रातून स्वपक्षीयांवर टीकेची झोड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - काँग्रेस पक्ष आज आपला १३१वा स्थापना दिवस साजरा करत असताना मुंबई काँग्रेसच्या 'काँग्रेस दर्शन' या मुखपत्रातून स्वपक्षीय नेत्यांवरच टीकेची झोड उठवण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
लेखामध्ये काश्मीर प्रश्नासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांना जबाबदार धरण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विषयांवर नेहरुंनी सरदार वल्लभाई पटेल यांची मत, विचार ऐकायला पाहिजे होते असे या लेखामध्ये म्हटले आहे. या महिन्याच्या काँग्रेस दर्शनच्या हिंदी आवृत्तीत हा लेख प्रकाशित झाला आहे. मात्र हा लेख लिहीणा-या लेखकाचे नाव या लेखामध्ये नाही.
सोनिया गांधींचे वडिल फॅसिस्ट सैनिक होते असेही या मुखपत्रात म्हटले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम या मुखपत्राचे संपादक आहेत. संजय निरुपम यांनी चूक झाल्याचे कबूल केले आहे. मी मुखपत्राच्या दैनंदिन कामकाजामध्ये सहभागी नसतो.त्यामुळे मला या लेखाची कल्पना नव्हती असे निरुपम यांनी सांगितले.