राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान - चव्हाण

By Admin | Updated: November 15, 2016 05:43 IST2016-11-15T05:47:01+5:302016-11-15T05:43:15+5:30

आजवर राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळेच काँग्रेसचे नुकसान झाले असून पक्षाला सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्रात बसला, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

Congress's loss due to NCP - Chavan | राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान - चव्हाण

राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान - चव्हाण

रहिमतपूर (जि.सातारा) : आजवर राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळेच काँग्रेसचे नुकसान झाले असून पक्षाला सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्रात बसला, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. रहिमतपूर (ता.कोरेगाव) येथे सोमवारी पालिका निवडणुकीत काँग्रेस प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, रहिमतपूर पालिकेच्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेस स्वबळावर लढत असून काँग्रेसच्या विजयाची ही नांदी आहे. इथे विजय मिळाला तर राज्यभर चांगला संकेत जाईल. आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. ते म्हणाले, घराघरात भांडणे लावण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. ज्या पक्षाचा इतिहास गद्दारीचा आहे, त्या पक्षाची सूज उतरविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मागेल ती ताकद पक्षीय पातळीवर दिली जाईल. यावेळी निवडणूक वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Congress's loss due to NCP - Chavan