पदवी’साठी काँग्रेसची परीक्षा

By Admin | Updated: May 22, 2014 02:17 IST2014-05-22T02:17:51+5:302014-05-22T02:17:51+5:30

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी झालेल्या पराभवापासून धडा

Congress's examination for 'graduation' | पदवी’साठी काँग्रेसची परीक्षा

पदवी’साठी काँग्रेसची परीक्षा

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी झालेल्या पराभवापासून धडा घेत काँग्रेस कामाला लागली आहे तर दुसरीकडे निवडणूक महिनाभरावर असताना भाजपची उमेदवारी जाहीर झालेली नाही. भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी जिंकलेली ही जागा भविष्यातही भाजपकडेच रहावी, यासाठी कार्यकर्ते मात्र सज्ज झाले आहेत. लोकसभेतील भाजपची दमदार लाट पाहता पदवीमिळविण्यासाठी काँग्रेसला मोठी कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. पदवीमिळविण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. सुशिक्षित मतदार असलेल्या या निवडणूक तब्बल ५१९६ मते ( ५.३८ टक्के) अवैध ठरली होती. २0१0 मध्ये पडोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. ही भाजपसाठी जमेची बाजू आहे.

पदवीधर मतदारसंघावर तसा भाजपचा पगडा राहिला आहे. रामजीवन चौधरी, गंगाधरराव फडणवीस व त्यानंतर नितीन गडकरी हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. गडकरी यांचे १९८९ पासून या मतदारसंघावर प्रभुत्व आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेल्या गडकरींची ही जागा यापुढेही कायम राखणे हे भाजपसाठी किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगायला नको.

जून २00८ मध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी यांनी काँग्रेस सर्मथित डॉ. बबनराव तायवाडे यांना पराभूत केले होते तर गोंदिया येथील इंजिनिअर प्रदीप पडोळे तिसर्‍या क्रमांकावर होते. गडकरी यांनी ५२ हजार ७६१ मते म्हणजे एकूण मतदानाच्या ५४.६३ टक्के मते घेत ही निवडणूक एकतर्फी केली होती. तायवाडे यांना २८, ८३६ (२९.८६ टक्के) तर पडोळे यांना ९४७१ (९.८१ टक्के मिळाली होती.) रिंगणातील उर्वरित ७ उमेदवारांची मतांची बेरीज ३00 च्या वर नव्हती. बहुतांश शिक्षक संघटना तायवाडे यांच्यासाठी कामाला लागल्या होत्या. मात्र, भाजपने फार पूर्वीपासून केलेली तयारी व पक्षाचे नेटवर्क यापुढे तायवाडे यांची शिक्षकी यंत्रणा फेल ठरली.

आता पुन्हा एकदा भाजपने वर्षभरापूर्वीपासून

नागपूर शहरात सर्वाधिक मतदार आहेत. त्यामुळे भाजप व काँग्रेस दोघेही नागपूर शहरावर फोकस करतील. दोन्ही पक्षांनी ग्रामीणमध्ये पंचायत समिती व शहरात प्रभाग स्तरापर्यंत नोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congress's examination for 'graduation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.