काँग्रेसच्या पराभवाने राज्यात राजीनामासत्र
By Admin | Updated: May 16, 2014 15:25 IST2014-05-16T15:25:07+5:302014-05-16T15:25:07+5:30
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने अनेकांनी राजीनामा द्यायला सुरूवात केली आहे.

काँग्रेसच्या पराभवाने राज्यात राजीनामासत्र
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६ - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने अनेकांनी राजीनामा द्यायला सुरूवात केली आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची त्सूनामी आली असून यामध्ये प्रादेशिक पक्ष वाहून गेले आहे. राज्यात आघाडीला मोठा हादरा बसल्याने काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला सुरूवात केली आहे. राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिले आहेत. तसेच रोहयोमंत्री नितीन राऊत यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त असून आपल्या मुलाचा दारूण पराभव झाल्याने नाराज झालेल्या उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही मुख्यमंत्र्याकडे पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.