शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Yashomati Thakur : "काम क्वालिटीचं दिसलं नाही तर डोकं फोडेन"; यशोमती ठाकूर यांचा अधिकाऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:49 IST

Congress Yashomati Thakur : यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याची घटना समोर आली आहे.

काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर (Congress Yashomati Thakur) यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याची घटना समोर आली आहे. काम क्वालिटीचं दिसलं नाही तर अधिकाऱ्यांना त्यांनी डोकं फोडेन असा इशारा दिला आहे. ठाकरे सरकारमध्ये यशोमती ठाकूर मंत्री होत्या. तसेच त्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. ठाकूर याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका रस्त्याच्या कामाच्या उद्धघाटनाचा बोर्ड लागलेला दिसत आहे. 

यशोमती ठाकूर यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण या कामात पैसे घेतले का? असा सवाल केला आहे. तसेच या रस्त्याचे काम व्यवस्थित न केल्यास डोकं फोडण्याचा इशारा देखील दिला आहे. यावर अधिकारी वर्ग काही वेळ शांत राहतो. अमरावती जिल्ह्यातील एका ठिकाणी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना त्यांनी हा इशारा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत असून त्याची चर्चा रंगली आहे. 

"केंद्रातील मोदी सरकारची दडपशाही सहन करणार नाही, प्रसंगी आमचा जीव गेला तरी बेहत्तर...सोनिया गांधींना कुणी हात लावला, तर आम्ही त्यांना माफ करणार नाही",  असे सांगत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणा दिल्या. 

केंद्रातील मोदी सरकारने जे काही चालवले आहे, कित्येक राज्यांमध्ये ईडीच्या भरोशावर ऑपरेशन लोटस सुरू केलेले आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसताना, त्या रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना चौकशीला बोलावले आहे, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. 

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या मोदी सरकारच्या कळसूत्री बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्या, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत. पण ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही, असंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं होतं.  

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरcongressकाँग्रेस