शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महाजनादेश विरुद्ध पोलखोल; मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काँग्रेस यात्रेतूनच देणार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 14:45 IST

२० ऑगस्टपासून काँग्रेसच्या यात्रेला सुरुवात होणार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री करत असलेले दावे खोडून काढण्यासाठी काँग्रेसकडून पोलखोल यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री त्यांच्या यात्रेदरम्यान अवास्तव आकडेवारीसह खोटे दावे करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यांना काँग्रेस २० ऑगस्टपासून पोलखोल यात्रेतून प्रत्युत्तर देईल, असं पटोले म्हणाले. १ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या मोझरीमधून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांची माहिती जनतेला देण्यासाठी भाजपाकडून ही यात्रा काढण्यात आली. मात्र महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री करत असलेले दावे खोटे असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. विरोधकांनी विकासकामांवरुन आपल्यासोबत उघड चर्चा करावी, असं आव्हान फडणवीसांनी दिलं. आम्ही त्यांनी वेळ आणि ठिकाण दिलं. मात्र त्यांनी प्रतिसादच दिला नाही, असा दावा पटोलेंनी केला. २० ऑगस्टला राजीव गांधींची जयंती आहे. तेव्हापासून काँग्रेसच्या पोलखोल यात्रेला सुरुवात होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांची यात्रा ज्या मार्गावरुन गेली, त्याच मार्गावरुन काँग्रेसची यात्रा जाईल. फडणवीसांनी केलेल्या दाव्यांची पोलखोल यात्रेतून करण्यात येईल, अशी माहिती पटोलेंनी दिली. 'गेल्या पाच वर्षांत राज्याचा दुप्पट विकास केल्याचा फडणवीसांचा दावा आहे. तब्बल ८ लाख कोटींची परकीय गुंतवणूक आणल्याचं ते सांगतात. त्यांच्या या दाव्यांमधील फोलपणा आम्ही जनतेसमोर आणू,' असं पटोले म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस