काँग्रेस तळागाळापर्यंत पोहचविणार : जगताप

By Admin | Updated: June 10, 2016 01:24 IST2016-06-10T01:24:24+5:302016-06-10T01:24:24+5:30

आगामी काळात काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहचविणार असल्याचे मत जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले.

Congress will reach the grassroots: Jagtap | काँग्रेस तळागाळापर्यंत पोहचविणार : जगताप

काँग्रेस तळागाळापर्यंत पोहचविणार : जगताप


केडगाव : आगामी काळात काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहचविणार असल्याचे मत जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले.
पारगाव (ता. दौंड) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाने माझ्यावर लहान वयात मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेस ताकदीचा पुरंदर पॅटर्न जिल्हाभर राबवणार आहे. प्रत्यक्षात गेल्या २ वर्षांत ७४ पेक्षा अधिक देशांचे दौरे करून परिस्थिती नसताना १ लाख ३५0 कोटी रुपयांची आर्थिक मदतीची खिरापत इतर देशांना वाटल्याचा आरोप जगताप यांनी केला. काँग्रेस तालुकाध्यक्ष पोपटराव ताकवणे म्हणाले, की प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठले पाहिजे.
याप्रसंगी दत्तात्रय कुंभार, संभाजी ताकवणे, शोभा वाघचौरे, मालन दोरगे, संपत फडके, तुकाराम ताकवणे, संतोष ताकवणे, दत्तात्रय ताकवणे, सोमनाथ ताकवणे, रवी ताकवणे, विश्वास ताकवणे, सुरेश ताकवणे, स्वामी शेळके, किसन जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Congress will reach the grassroots: Jagtap