काँग्रेसला १४० जागा मिळतील - विश्वजीत कदम
By Admin | Updated: October 10, 2014 05:39 IST2014-10-10T05:39:27+5:302014-10-10T05:39:27+5:30
युवक काँग्रेस राज्यात १८ जागा लढवित असून, त्यापैकी निम्म्या जागा निवडून येतील़ तसेच विधानसभेत वेगळी परिस्थिती राहणार

काँग्रेसला १४० जागा मिळतील - विश्वजीत कदम
अहमदनगर : युवक काँग्रेस राज्यात १८ जागा लढवित असून, त्यापैकी निम्म्या जागा निवडून येतील़ तसेच विधानसभेत वेगळी परिस्थिती राहणार असून, काँग्रेसला १४०च्या आसपास जागा मिळतील, असा दावा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी गुरुवारी व्यक्त केला.
आघाडी तोडण्यास राष्ट्रवादीच कारणीभूत असून, त्यांची भाजपासोबत छुपी युती असल्याचा आरोप त्यांनी केला़ शहर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ ते नगरमध्ये आले होते़ त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कदम म्हणाले, लोकसभा निवडणुकीत प्रसार माध्यमांनी भाजपाची हवा निर्माण केली. आता तशी परिस्थिती नाही.