शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलेंडरच्या किमतीमधून मोदी सरकारने केलेल्या लुटीचा पर्दाफाश करणार, काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 17:05 IST

LPG Gas Cylinder: मोदी सरकारने आधी जनतेच्या खिशावर दरोडा टाकला आणि आता २०० रुपये कमी करुन दिलासा देत असल्याचा ढोल बडवत आहेत, मोदी सरकारचा हा खोटारडेपणा या पत्रकार परिषदांमधून उघड केला जाणार आहे, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. 

मुंबई - गॅसच्या किंमती ७०० रुपयांनी वाढवून मोदी सरकारने आधी जनतेच्या खिशावर दरोडा टाकला आणि आता २०० रुपये कमी करुन दिलासा देत असल्याचा ढोल बडवत आहेत, मोदी सरकारचा हा खोटारडेपणा या पत्रकार परिषदांमधून उघड केला जाणार आहे, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. 

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमिटरची भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर २०२३ रोजी एक वर्ष होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर सर्व जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा काढून पहिला वर्धापन दिन साजरा करणार आहे. दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सर्व जिल्ह्यात प्रमुख नेते पत्रकार परिषदा घेऊन केंद्रातील मोदी सरकारने जनतेची कशी लुट केली याचा पर्दाफाश करणार आहेत.

२०१४ साली LPG गॅसची किंमत ४५० रुपये होती, ही वाढवून मागील ९ वर्षात ११५० रुपये केली व रक्षाबंधनच्या दिवशी २०० रुपयांनी कमी केली, मोदी सरकारची ही व्यापारी वृत्ती सर्वसामान्यांना लुटणारी आहे. गॅसच्या किंमती ७०० रुपयांनी वाढवून मोदी सरकारने आधी जनतेच्या खिशावर दरोडा टाकला आणि आता २०० रुपये कमी करुन दिलासा देत असल्याचा ढोल बडवत आहेत, मोदी सरकारचा हा खोटारडेपणा या पत्रकार परिषदांमधून उघड केला जाणार आहे. पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत पदयात्रा काढली जाणार आहे व त्यानंतर ६ ते ७ या वेळेत जाहीर सभा घेतली जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांवर जिल्हावार जबाबदारी देण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर, नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अहमदनगरमध्ये विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अकोलामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पुणे जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ठाणे जिल्ह्यात प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसिम खान, नाशिकमध्ये CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, कोल्हापूरमध्ये विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, औरंगाबादमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूरमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, जळगावमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  सर्व जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांपासून भारत जोडो यात्रेची सुरुवात केली जाणार आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस