काँग्रेस गेली आयसीयूमध्ये!
By Admin | Updated: May 17, 2014 04:41 IST2014-05-17T04:41:04+5:302014-05-17T04:41:04+5:30
ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने शेतकर्यांना वीजदरात सवलत दिली, मुंबईतल्या झोपडपट्यांंना संरक्षण देण्यासाठी कायदा केला,

काँग्रेस गेली आयसीयूमध्ये!
ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने शेतकर्यांना वीजदरात सवलत दिली, मुंबईतल्या झोपडपट्यांंना संरक्षण देण्यासाठी कायदा केला, अनधिकृत घरांच्या बाबतीत निर्णय घेतले, मात्र यातली एकही बाब काँग्रेसच्या मदतीला आली नाही. देशाला १७ खासदार देणार्या काँग्रेसच्या वाट्याला या निवडणुकीत अवघे दोन खासदार आले, एवढा दारुण पराभव काँग्रेसचा या आधीही कधी झाला नव्हता. गुजरातपेक्षा महाराष्टÑ अनेक गोष्टींवर आघाडीवर असताना, राज्यात आजपर्यंत झालेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधे मिळालेले यश, प्रामाणिक मुख्यमंत्री अशी प्रतिमा, मुंबईत पायाभूत सोयीसुविधांचे उभे केलेले जाळे, भ्रष्टाचारात लिप्त असणारे मंत्री राष्टÑवादीचे आहेत, काँग्रेसचा त्याच्याशी संबंध नाही असे चित्र निर्माण करण्यात आलेले यश, एवढ्या जमेच्या बाजू असताना देखील काँग्रेसचा न भूतो न भविष्यती असा पराभव राज्यात का झाला? या प्रश्नाने प्रत्येक काँग्रेस नेत्याला भंडावून सोडलेले आहे. दुसर्याकडे असे बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटे येतात याचा मात्र याच नेत्यांना सोयीस्कर विसर पडला. साध्या विशेष कार्यकारी अधिकार्यांच्या नेमणुका देखील केल्या नाहीत, विविध महामंडळांवर पदाधिकारी नाहीत, इथपासून ते कार्यकर्त्यांची छोटी छोटी कामे होईनाशी झाली. मुख्यमंत्र्यांकडे फायली पडून असतात, वेळेवर निर्णय होत नाहीत, या सातत्याने होणार्या आरोपाचे खंडन करता आले नाही.