शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:28 IST

Congress Vijay Wadettiwar News: कुठल्याही बॅनरशिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल. दोन्ही ठाकरे बंधूंकडून निमंत्रण आले तर आम्ही विचार करू, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

Congress Vijay Wadettiwar News: इयत्ता पहिलीपासून सक्तीने हिंदी शिकवण्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. ५ जुलैला मनसेचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला उद्धव ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही या मोर्चाचे समर्थन केले आहे. दोन्ही गट या मोर्चात सहभागी होणार आहेत. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यातच आता काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात हिंदी सक्ती नको ही भूमिका आम्ही या आधीच मांडली आहे, जर ठाकरे बंधू एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनरशिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल आणि दोन्ही भावांचे निमंत्रण आले तर आम्ही विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले. 

मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता

काँग्रेस या मोर्चात सहभागी होणार का, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. यावर, मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता. त्यांनी मोर्चात सामील होण्याची विनंती केली आहे. सोबतच राज ठाकरे यांचाही स्वतंत्र निरोप आहे, हेही सांगितले. त्यामुळे माझ्या पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करतो आणि आम्ही भूमिका घेऊ, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

दरम्यान, जर हे दोन्ही बंधू हिंदी सक्ती विरोधात एकत्र येत असतील तर आम्हाला निश्चितच त्याचा आनंद आहे. या निमित्ताने दोन्ही भावांच्या एकत्रिकरणाचे पुढचे पाऊल टाकले जात असेल तर आमची भूमिका समर्थनातच आहे. बिना झेंड्याचा बिना बॅनरचा जर मोर्चा असेल आणि हिंदी सक्ती विरोधात सर्व एकत्र येणार असेल. दोन्ही भावांनी पुढाकार घेतला असेल तर आमची भूमिका सकारात्मक राहील, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेmarathiमराठीhindiहिंदी