शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

“राणाला आणायला १५ वर्षे का लागली, महापालिका निवडणुकीत उपयोग करून घेण्याचा प्रयत्न”: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:18 IST

Tahawwur Rana Extradition To India: तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Tahawwur Rana Extradition To India: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर आता राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील अनेक तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली आहेत. अखेरीस तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. आताच्या घडीला राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. 

तहव्वुर राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. अमेरिकेतून आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने अटक केली. यानंतर आता पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून टीका केली आहे. 

तहव्वूर राणाला आणायला १५ वर्षे का लागली?

आनंद आहे, तहव्वूर राणाला भारतात आणले असेल तर दाऊदला का आणले नाही.  या बॉम्बस्फोटामागे कोण होते? हे सर्वांना माहिती आहे. जबाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला भारतात आणावे.  महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राणाला भारतात आणून राजकारण करू नये, त्याला फाशी दिली पाहिजे. तहव्वूर राणाला आणायला १५ वर्षे का लागली? महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये त्याचा उपयोग करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत, म्हणून आता जुमलेबाजी करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 

दरम्यान, तहव्वूर राणा याला भारतात आणले गेले आहे, याबाबत पत्रकारांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. भारताचे मोठे यश आहे. ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याच्याविरुद्ध कोणता खटला दाखल होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता याबद्दल बोलणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबद्दल बोलेन, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार