काँग्रेस स्वबळावर !
By Admin | Updated: January 12, 2017 04:13 IST2017-01-12T04:13:30+5:302017-01-12T04:13:30+5:30
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला असून आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक

काँग्रेस स्वबळावर !
मुंबई : राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला असून आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्याचा निर्णय दिल्ली येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबईसह दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा बुधवारी झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिल्ली गाठून महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेतली. या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करू नये, असे बहुसंख्य नेत्यांचे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे मत असल्याचे त्यांनी मोहन प्रकाश यांना सांगितले. पक्षवाढीसाठी ही निवडणूक स्वबळावर लढवावी असा अनेकांचा आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीसोबत सरसकट आघाडी न करता परिस्थिती पाहून आघाडीचा अधिकार स्थानिक पातळीवरील पक्ष पदाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सुत्रांकडून समजते. (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतही स्वबळावर
मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढविणार असून तशी माहिती पक्षश्रेष्ठींना दिली आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.