शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Sawant : "दया, कुछ तो गडबड है"; जाहिरातीवरून काँग्रेस नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 15:18 IST

Congress Sachin Sawant : काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी जाहिरातीवरून टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

राज्यातील अनेक वर्तमानपत्रात शिवसेनेतील शिंदे गटाने जाहिराती दिल्या आहेत.  या जाहिरातीमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे', असं शीर्षकामध्ये म्हटलं आहे. या जाहिरातीवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच दरम्यान जाहिरातीवरून काँग्रेसनेही शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला आहे. "दया, कुछ तो गडबड है" म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. 

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी जाहिरातीवरून टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दया (sorry देवा), कुछ तो गडबड है......" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच सीआयडी मालिकेतील कलाकारांच्या फोटोवर अभिनेते शिवाजी साटम यांचा प्रसिद्ध डायलॉगदेखील लिहिला आहे. सचिन सावंत यांचं ट्विट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

ठाकरे गटाचे नेते नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. तसेच "54 % जनता ही तुमच्या विरोधात, जाहिरात खोटी, जनतेच्या मनात धूळ फेकणारी" म्हणत खोचक टोला लगावला आहे. "राजकारणात दोन आणि दोन चार होत नसतं. तर कधी कधी दोन-दोन सहा पण होतात. तर कधी कधी दोन आणि दोन दोनच राहतात" असं म्हणत दानवेंनी निशाणा साधला आहे. "जसं महाराष्ट्रातील जनता भाजप शिवसेनेला 46 टक्के मत त्यांच्या बाजूनं दिल्याचे हे सांगत आहेत. त्याचबरोबर राज्यातील 54 % जनता ही त्यांच्या विरोधात असल्याचं येथे सिद्ध होतं. म्हणून तुमची ही जाहिरात खोटी आहे. जनतेच्या मनात धूळ फेकणारी आहे. तुमचं हे सर्वेक्षणच तुमच्या विरोधात आहे" असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. 

आज राज्यातील अनेक वृतपत्रात शिवसेनेच्या शिंदे गटाने जाहिरात दिली आहे. या जाहिरातीला 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे', असं म्हटलं आहे. या जाहिरातीत एका सर्वेचा अहवाल दिला आहे.  'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पामुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे',असं या जाहिरातीत म्हटले आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदाचे सर्वेक्षणही दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2% जनतेला मुख्यमंत्रीपदावर पहायचे आहे, म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3 % जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शवली, असं यात म्हटलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.  

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस